ETV Bharat / state

विदर्भ तापला, चंद्रपुरात 46.4 अंश तापमानाची नोंद

मागच्या वर्षी चंद्रपूर शहराचे तापमान हे जागतिक पातळीवर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर होते. याही वर्षी शहराचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. 23 मे रोजी चंद्रपूरचे तापमान 45.6 अंश सेल्सिअस होते, 24 मे रोजी 46.6 तर 25 मे या दिवशी 46.8 अंश सेल्सिअस तर आज हे तापमान 46.4 इतके नोंदविण्यात आले.

author img

By

Published : May 27, 2020, 7:44 PM IST

Chandrapur recorded 46.4 degrees Celsius
चंद्रपूरमध्ये 46.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

चंद्रपूर - जिल्ह्यात आज 46.4 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. हे तापमान विदर्भातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत चंद्रपुरात सर्वाधिक होते.

चंद्रपूर शहराचे तापमान उन्हाळ्यात 49 अंश सेल्सिअसपर्यंत जाते. जेव्हा नवतपा सुरू असतो, त्यात सर्वाधिक तापमानाची नोंद होत असते. सध्या नवतपा सुरू आहे. म्हणजे नऊ दिवस तापमान उच्चतम पातळीवर जात असते. मागच्या वर्षी चंद्रपूर शहराचे तापमान हे जागतिक पातळीवर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर होते. याही वर्षी शहराचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. 23 मे रोजी चंद्रपूरचे तापमान 45.6 अंश सेल्सिअस होते, 24 मे रोजी 46.6 तर 25 मे या दिवशी 46.8 अंश सेल्सिअस तर आज हे तापमान 46.4 इतके नोंदविण्यात आले.

आजचे तापमान हे विदर्भातील सर्वाधिक तापमान आहे. येणाऱ्या काही दिवसांत हे तापमान आणखी वाढणार आहे. सध्या लॉकडाऊनमुळे लोक कमी प्रमाणात बाहेर पडत आहेत. मात्र, तरीही बाहेर पडताना उन्हापासून संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी जास्त खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.