ETV Bharat / state

खऱ्ऱ्याचा शोक पडेल महागात, पोलिसांनी सुरू केला कारवाईचा सपाटा - खर्रा म्हणजे काय

चंद्रपुरात तंबाखू, सुपारी आणि चुन्यापासून तयार केला जाणारा खर्रा हा प्रसिद्ध आहे. याची मोठी मागणी जिल्ह्यात सर्वत्र आहे. त्यामुळे अनेक जण आपला खर्र्याचा शौक पुरा करण्यासाठी बाहेर पडत आहे.

chandrapur police is taking action for breaking lockdown for silly reason
खऱ्ऱ्याचा शोक पडेल महागात, पोलिसांनी सुरू केला कारवाईचा सपाटा
author img

By

Published : Apr 12, 2020, 7:35 AM IST

चंद्रपूर - जिल्ह्यात सर्वत्र संचारबंदी असतानाही अनेक ठिकाणी खर्र्याची विक्री सुरू आहे. अशी विक्री आणि खरेदी करणाऱ्यावर रामनगर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांच्यावर भादंवि कलम 188 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

कोरोनामुळे सर्व देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हा संसर्ग पसरू नये, यासाठी तत्काळ सुविधा वगळता लोकांना घराबाहेर न पडण्यासाठी सांगण्यात आले आहे. मात्र अजूनही काही नागरिकांचे घराबाहेर पडणे सुरूच आहे. विशेष म्हणजे आपले शौक पुरे करण्यासाठी ते आपला आणि इतरांचाही जीव धोक्यात घालत आहेत. चंद्रपुरात तंबाखू, सुपारी आणि चुन्यापासून तयार केला जाणार खर्रा हा प्रसिद्ध आहे. याची मोठी मागणी जिल्ह्यात सर्वत्र आहे. त्यामूळे अनेक जण आपला खर्र्याचा शौक पुरा करण्यासाठी बाहेर पडत आहे. त्यांच्या मागणीनुसार खर्रा विकण्यात देखील येत आहे. आज रामनगर पोलिसांनी अशा शौकीन लोकांवर कारवाई केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.