ETV Bharat / state

'गाव तिथे बिअर बार' चंद्रपूरातील महिला उमेदवाराचं अनोखे आश्वासन - दारिद्र्य रेषेखालील लोकांना स्वस्तात दारू

चिमूर विधानसभा मतदारसंघातील अखिल भारतीय मानवता पक्षाच्या महिला उमेदवाराने मतदारांना आगळे-वेगळे आश्‍वासन दिले आहे. त्यांनी दारिद्र्य रेषेखालील जनतेला सवलतीच्या दराने मद्य मिळवून देणार आणि जिल्ह्यातील दारूबंदी हटवणार, असे जाहीर केले आहे.

चिमूर विधानसभा मतदारसंघ
author img

By

Published : Oct 17, 2019, 3:53 PM IST

Updated : Oct 19, 2019, 4:16 PM IST

चंद्रपूर - जिल्ह्यातील चिमूर विधानसभा मतदारसंघात दहा उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये वनिता राऊत या एकमेव महिला उमेदवार आहेत. निवडणुकीमध्ये प्रत्येक राजकीय पक्ष अथवा उमेदवार आपला जाहीरनामा प्रसिद्ध करत असतो. चिमूरच्या अखिल भारतीय मानवता पक्षाच्या राऊत यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात समाजात मान्यता नसलेल्या दारू व्यसनाविषयी अजबच योजना राबवण्याचे जाहीर केली आहे. त्यांच्या या दारूबंदी हटवण्याची घोषणा आणि इतर सर्व घोषणा सध्या चर्चेचा विषय बनल्या आहेत.

'गाव तिथे बिअर बार' चंद्रपूरातील महिला उमेदवाराचं अनोखे आश्वासन

गाव तिथे बियर बार .. दारिद्र्य रेषेखालील लोकांना स्वस्तात दारू

राज्य सरकारने चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिल २०१५ पासून दारूबंदी लागू केली आहे. मात्र कडक कायदे व पुरेसे मनुष्यबळ यांच्या अभावी जिल्ह्यात सर्वत्र पूर्वीपेक्षा तिप्पट भावाने दारू उपलब्ध होत आहे. मध्यतरी दारूबंदी हटवण्याची मागणी करण्यात आली होती. यावरून जिल्ह्यात मोठे राजकारण सुरू झाले होते. यातच राज्यात विधानसभा निवडणूकीची घोषणा झाली. यामुळे चिमूर विधानसभा मतदारसंघातील अखिल भारतीय मानवता पक्षाच्या महिला उमेदवाराने चक्क 'दारूबंदी हटलीच पाहिजे' अशा आशयाचे पत्रक प्रसिद्ध केले आहे.

हेही वाचा... धक्कादायक.. भाजपनंतर आता काँग्रेसचा टी शर्ट घालून तरुणाची आत्महत्या

पत्रकात दारू पिणे ही सामाजिक प्रथा जाणवत असल्याचे सांगण्यात आले. दारुबंदीला सामाजिक मान्यता मिळत नसल्याने ती प्रत्यक्षात येऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी परिसरातील जनता चोरून-लपून व दुप्पट-तिप्पट भावाने दारू खरेदी करून पीत असल्याची खंत व्यक्त केली आहे. दारूमुळे कुटुंब उध्वस्त होतात हा एक तर्क असून, नवरा-बायको, पोरं मिळून जसे जेवण करतात तसेच एकत्र बसून दारू प्यायल्यास त्यांच्यात वाद होणार नाही. घरीच ऑम्लेट चखना खाऊन त्यांचेही आरोग्य सुधारणार! असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा... 'पुन्हा आणूया आपले सरकार'.. भाजपचा टी शर्ट घालून बुलडाण्यात शेतकऱ्याची आत्महत्या

यात राऊत यांनी जाहिरनाम्यात पुढे असे सांगितले आहे की, लोक सण-उत्सव यात नाचतात, गातात आणि आनंद साजरा करतात. तसेच पर्यटन स्थळांना भेट दिल्यावर देऊन कोंबडा-बकरा खातात तर लग्न-समारंभात डीजे वाजवून आनंद साजरा करतात असतात. अशावेळी मनोरंजनात मग्न लोकांना पाहता जनता सुखी संपन्न असल्याची खात्री त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे या आनंदी लोकांना दारू पिण्यापासून वंचित ठेवणे, ही मोठी चूक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यामुळे आपण आमदार म्हणून निवडून आल्यास दारूबंदी हटविण्यासह, गावा-गावातील बेरोजगार तरुणांना दारू विक्रीचे परवाने व गाव तिथे बियर बार ही योजना राबवणार आहोत. तसेच दारिद्र्य रेषेखालील लोकांना सवलतीत मद्य उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.

हेही वाचा.... 'त्या' शेतकऱ्याची आत्महत्या गृहकलहातून, पोलीस तपासात निष्पन्न

Intro:परिवारासह बसून दारू पिल्याने वाद होणार नाही
चिमूर विधानसभा क्षेत्रातील महिला उमेदवाराचा आशावाद

गाव तिथे बियर बार ही योजना राबविणार ; दारिद्य्र रेषेखालील लोकांना स्वस्तात मद्य

चिमूरMHC10019
विधानसभा निवडणुकांच्या अधिकृतपणे प्रचाराला सुरुवात झाली असून चिमूर विधानसभा मतदार सांगतात दहा उमेदवार रिंगणात आहेत त्यामध्ये एकमेव महिला उमेदवार आहे निवडणुकीमध्ये प्रत्येक उमेदवार आपला राजकीय पक्ष्याचा जाहीरनामा प्रसिद्ध करतात राजकीय पक्षांचा जाहिरनामा प्रसिद्ध होण्यास वेळ असला तरी चिमूर विधानसभा निवडणुकीतील अखिल भारतीय मानवता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात समाजात मान्यता नसलेल्या दारू व्यसना विषयी अजबच योजना राबविण्याचे जाहीर करण्यात आले आहे सद्या हे प्रसिद्धीपत्रक सोशल मीडियावर सैराट झाले असून हा चर्चेचा विषय झाला आहे.

युती सरकारने चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिल २०१५ पासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू केली.कडक कायदे व पुरेश्या मनुष्यबळाअभावी जिल्ह्यात सर्वत्र पूर्वी पेक्षा तिप्पट भावानी दारू उपलब्ध आहे.मध्यतरी दारूबंदी हटविण्याची मागणी उठविण्यात आली. या वर जिल्ह्यात मोठं राजकारण सुरू आहे जिल्ह्यात हे सर्व सुरू असतानाच राज्यात विधानसभा निवडणूक प्रक्रिया सुरू असून 8 तारखेपासून प्रचार सुरू झाला आहे चिमूर विधानसभा क्षेत्रातील अखिल भारतीय मानवता पक्ष्याच्या महिला उमेदवाराने चक्क 'दारूबंदी हटलीच पाहिजे' अश्या आशयाचे पत्रक प्रसिद्ध केले असून प्रसिध्दीपत्रकात मतदारांना आवाहन करतांना प्रकाशकाने निवडणूक जाहीरनामा प्रसिध्द करताना दारू विषयक अनेक योजना जाहिर केल्या आहेत.
या पत्रकात दारू पिणे ही सामाजिक प्रथा जाणवत असल्याचे सांगण्यात आले.दारुबंदीला सामाजिक मान्यता मिळत नसल्याने ती प्रत्यक्षात येवु शकत नाही तर यात त्यांनी क्षेत्रातील जनता चोरून-लपून व दुप्पट-तिप्पट भावानी खरेदी करून पीत असल्याने खंत व्यक्त करत सद्याच्या दारुबंदीवर पाप आहे अशी टीका केली आहे.दारूमुळे कुटुंब उध्वस्त होतात हा एक तर्क असून,नवरा-बायको,पोरं मिळून जसे खर्रा खातात तसेच एकत्र बसून दारू प्यायल्यास त्यांच्यात वाद होणार नाही.घरीच ऑम्लेट चखना खाऊन त्यांचे आरोग्य सुधारणार! असा आशावाद त्यांनी केला आहे.

त्यांनी यात सांगितलं की,लोक सण-उत्सव नाचत-गाजत साजरे करत असून पर्यटन स्थळांना भेट देऊन कोंबडा-बकरा खाऊन तर लग्न-समारंभात डीजे वाजवून तर गंजीपा,चकलस अट्टू खेळत असतात.मनोरंजनात मग्न लोक बघून जनता सुखी संपन्न असल्याची खात्री त्यांनी व्यक्त केली. क्षेत्रातील तरुण, शेतकरी-शेतमजूर उदरनिर्वाह करून आनंदी आहेत. आणि या आनंदी लोकांना दारू पिण्यापासून वंचित ठेवणे ही मोठी चूक असल्याचे तर आमदार म्हणून निवडून आल्यास दारूबंदी हटविण्यासह,गावा-गावातील बेरोजगार तरुणांना दारू विक्रीचे परवाने व गाव तिथे बियर बार ही योजना राबविण्यासह दारिद्र्य रेषेखालील लोकांना सवलतीत उपलब्ध करून देण्यार यात जाहीर केलं असून या बाबीचा नोंद घेऊन मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.त्यामुळे या महिला उमेदवाराचा हा जाहीरनामा चांगलाच चर्चेत आला आहे
Body:१ ) महिला उमेदवार - वनिता जितेंद्र राऊत ,२ ) राष्ट्रिय अध्यक्ष - अखिल भारतिय मानवता पक्ष - जितेंद्र सहारेConclusion:
Last Updated : Oct 19, 2019, 4:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.