ETV Bharat / state

...म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील 4 सरपंचांसह 71 ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द

नागभीड तालुक्यातील गिरगाव, कोसंबी गवळी, नवेगाव पांडव व गोविंदपूर या ग्रामपंचायतीच्या चार सरपंचांसह विविध ग्रामपंचायतमधील सदस्यांचे पदे रद्द केली आहेत. विहित मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याचा ठपका ठेऊन जिल्हाधिकाऱयांनी त्यांचे पद रद्द करण्याचे आदेश काढले.

चंद्रपूर जिल्ह्यातील 4 सरपंचांसह 71 ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द
author img

By

Published : Nov 8, 2019, 1:03 PM IST

चंद्रपूर - जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील गिरगाव, कोसंबी गवळी, नवेगाव पांडव व गोविंदपूर या ग्रामपंचायतीच्या चार सरपंचांसह विविध ग्रामपंचायतमधील सदस्यांची पदे रद्द केली आहेत. विहित मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याचा ठपका ठेऊन जिल्हाधिकाऱयांनी त्यांचे पद रद्द करण्याचे आदेश काढले. तालुक्यातील चार सरपंचांसह ७१ ग्रामपंचायत सदस्यांचे सभासदत्व रद्द झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील 4 सरपंचांसह 71 ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द

जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम १० - १ ( अ ) अन्वये ग्रामपंचायत निवडणुकीनंतर विहित मुदतीमध्ये जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यात आले नाही. यात नागभीड तालुक्यातील गिरगावचे सरपंच प्रशांत गायकवाड, कोसंबी गवळीच्या सरपंच रंजुताई गायकवाड, नवेगाव पांडवच्या सरपंच शर्मीलाताई रामटेके व गोंविदपुरचे उमाजी खोब्रागडे यांच्या पदांसह इतर ग्रामपंचायत सदस्य असे एकूण ७१ पदाधिकाऱ्यांचे पद रद्द करण्यात आल्याचे आदेश ४ नोव्हेंबरला देण्यात आले आहेत.

हेही वाचा - आमदार फुटण्याच्या भीतीनेच शिवसेनेचे सर्व आमदार रंगशारदामध्ये..

यामध्ये अनुसुचित जमातीचा मोठा समावेश आहे. त्यातही माना जमातीचा पडताळणीचा प्रश्न मार्गी लागला नसल्याने त्यांची संख्या जास्त आहे. या बरखास्त केलेल्यांमध्ये विहित मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांचाही समावेश असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य संजय गजपूरे यांनी केला आहे. अशा सदस्यांचे आदेश रद्द करण्याची मागणी खासदार, पालकमंत्री आणि आमदारांना केली असल्याचे त्यांनी सांगितले. तालुका सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन याविषयीची चर्चा तहसीलदार तथा संवर्ग विकास अधिकाऱ्याशी करण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे सुद्धा या विषयावर चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती गजपूर यांनी दिली.

Intro:चार सरपंचासह ७१ ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द
जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश
चिमूर
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिड तालुक्यातील गिरगाव , कोसंबी गवळी , नवेगाव पांडव व गोविंदपुर या ग्रामपंचायतीच्या चार सरपंचा सह विविध ग्रामपंचायती मधील सदस्यांनी विहित मुदतीत जात पडताडणी प्रमाणपत्र सादर न केल्याचा ठपका ठेऊन जिल्हाधिकारी चंदपूर यांनी त्यांचे पद रद्द करण्याचे आदेश काढले . तालुक्यातील चार सरपंचासह ७१ ग्रामपंचायत सदस्यांचे सभासदत्व रद्द झाल्याने राजकीय हडकंप माजले आहे .
जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी मुंबई ग्रामपंचा 'यत अधिनियम १९५८ च्या कलम १० - १ ( अ ) अन्वये ग्रामपंचायत निवडणुकी नंतर विहित मुदती मध्ये जात पडताडणी प्रमाणपत्र सादर करण्यात आले नसल्याचा ठपका ठेऊन नागभिड तालुक्यातील गिरगावचे सरपंच प्रशांत गायकवाड , कोसंबी गवळीच्या सरपंच रंजुताई गायकवाड , नवेगाव पांडवच्या सरपंच शर्मीलाताई रामटेके व गोंविदपुरचे उमाजी खोब्रागडे याचे पदासह इतर ग्रामपंचायत सदस्य असे एकुन ७१ पदाधिकाऱ्यांचे पद रद्द करण्यात आल्याचे आदेश ४ नोहेम्बंरला देण्यात आले आहेत .
यामध्ये अनुसुचित जमातीचा मोठा समावेश आहे , त्यातही माना जमातीचा पडताडणीचा प्रश्न मार्गी लागला नसल्याने त्यांची संख्या जास्त आहे . या बरखास्त केलेल्या मध्ये विहित मूदतीत जात पडताडणी प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांचाही समावेश असल्याचा आरोप जिल्हा परीषद सदस्य संजय गजपूरे यांनी केला असुन अशा सदस्यांचे आदेश रद्द करण्याची मागणी खासदार , पालकमंत्री आणी आमदाराला केली आहे . तालुका सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्याना सोबत घेऊन याविषयीची चर्चा तहसीलदार तथा संवर्ग विकास अधिकाऱ्याशी करण्यात आली आहे . तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे सुद्धा या विषयावर चर्चा करण्यात येणार असल्याची माहीती गजपूर यांनी दिली .
Body:जिल्हा परिषद सदस्य संजय गजपूरेConclusion:

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.