ETV Bharat / state

वन्य प्राण्यांसाठी पाण्याची सोय; बांधण्यात आला वनराई बंधारा

पाण्याच्या शोधार्थ अनेक वेळा हे वन्यजीव मानवी वस्तीत वावर करताना दिसून येत आहेत. त्यांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. त्यामुळे चिमूर वनपरिक्षेत्रअंतर्गत येणाऱ्या पिटिचुवा नाल्यावर वनराई बंधारा बांधला आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांसाठी वनक्षेत्रातच पाण्याची सोय होणार आहे.

चंद्रपूर
चंद्रपूर
author img

By

Published : Dec 3, 2020, 7:11 PM IST

चंद्रपूर - जंगलातील जलस्त्रोत आटले असून अन्न व पाण्याच्या शोधात प्राण्यांनी मानवी वस्तीकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळे मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस बिकट स्थिती धारण करत आहे. त्यामुळे चिमूर वनपरिक्षेत्रअंतर्गत येणाऱ्या पिटिचुवा नाल्यावर वनराई बंधारा बांधला आहे. वन्यप्राण्यांसाठी वनक्षेत्रातच पाण्याची सोय होणार आहे.

तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगल क्षेत्र असुन वन्य जिव संरक्षण कायद्यामूळे व वनविभागाच्या विविध उपायाने वन्यप्राण्यांची संख्या वाढली आहे. कमी झालेल्या पावसामुळे उन्हाळ्या अगोदरच नदी, नाले, तलाव कोरडे होतात. त्यामुळे वाघ, बिबट, अस्वल, हरीण अशा अनेक वन्य जीवांना उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. पाण्याच्या शोधार्थ अनेक वेळा हे वन्यजीव मानवी वस्तीत वावर करताना दिसून येत आहेत.

त्यामुळे वन्य प्राण्यांना जंगलातच पाणी उपलब्ध व्हावे, म्हणून वन विभागाकडून अनेक उपक्रम राबवण्यात येतात. याच उपक्रमाअंतर्गत चिमूर वनपरिक्षेत्रअंतर्गत येणाऱ्या गदगाव नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक 372 मध्ये पिटीचुवा नाल्यावर वनराई बंधारा बांधण्यात आला. त्यामुळे वन्य जीवांचे होणारे हाल थांबतील.

हेही वाचा - जागतिक दिव्यांग दिन विशेष : घरोघरी जाऊन साबण विकणारे जयसिंग झाले कोट्यधीश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.