Police Officer Suicide : चंद्रपुरात कारागृह अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर - Suicide
चंद्रपूर जिल्हा कारागृहातील अधिकारी महेश कुमार माळी यांनी सोमवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांची प्रकृती गंभीर असून खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
![Police Officer Suicide : चंद्रपुरात कारागृह अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर Attempted suicide of a prison officer in Chandrapur](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-14807678-986-14807678-1647999122882.jpg?imwidth=3840)
चंद्रपूर - चंद्रपूर जिल्हा कारागृहातील ( Chandrapur District Jail ) एका अधिकाऱ्याने आत्महत्या करण्याचा ( Suicide Attempt ) प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महेशकुमार माळी (40) असे या अधिकाऱ्याचे नाव असून ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली. अधिकाऱ्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
आठ महिन्यापूर्वी गडचिरोली जिल्हा कारागृहातून चंद्रपूर जिल्हा कारागृहात महेश कुमार माळी यांची बदली झाली होती. सोमवारी सायंकाळी ते घरून जेवण करून बाहेर गेले. त्यानंतर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. याबाबतची माहिती होताच त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करून प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहे. त्यांनी प्रेम प्रकरणातून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची चर्चा सुरू आहे.