ETV Bharat / state

बांबू प्रशिक्षण केंद्रातील मास्टर ट्रेनर्सचे आंदोलन, पुन्हा सेवेत रुजू करून घेण्याची मागणी

बांबू संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बीआरटीसी) ने मोठा गाजावाजा करुन, १५ मास्टर ट्रेनर्सना सरळ सेवा भर्तीने नियुक्ती दिली होती. मात्र आता त्याच मास्टर ट्रेनर्सवर उपासमारीची वेळी आली आहे. या अन्यायग्रस्त मास्टर ट्रेनर्सनी आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. येत्या 7 दिवसात आपल्याला पुन्हा सेवेत घेतले नाही, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशरा त्यांनी निवेदनातून दिला आहे.

बांबू प्रशिक्षण केंद्रातील मास्टर ट्रेनर्सचे आंदोलन

author img

By

Published : Mar 14, 2021, 9:42 PM IST

चंद्रपूर - बांबू संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बीआरटीसी) ने मोठा गाजावाजा करुन, १५ मास्टर ट्रेनर्सना सरळ सेवा भर्तीने नियुक्ती दिली होती. मात्र आता त्याच मास्टर ट्रेनर्सवर उपासमारीची वेळी आली आहे. या अन्यायग्रस्त मास्टर ट्रेनर्सनी आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. येत्या 7 दिवसात आपल्याला पुन्हा सेवेत घेतले नाही, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशरा त्यांनी निवेदनातून दिला आहे.

बांबू प्रशिक्षण केंद्रातील मास्टर ट्रेनर्सचे आंदोलन

नेमके काय आहे प्रकरण?

बीआरटीसीची स्थापना 4 डिसेंबर 2014 मध्ये झाली होती. त्यानंतर बीआरटीसीच्या वतीने मास्टर ट्रेनरच्या जागेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. मास्टर ट्रेनर या पदासाठी त्यावेळी जिल्हाभरातून 65 अर्ज आले होते, त्यातील 62 उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या, 62 मधून 15 उमेदवारांची सरळसेवा भरतीद्वारे निवड करण्यात आली. हे सर्व ट्रेनर 5 जूलै 2015 ला नियुक्त झाले, मात्र त्यांना त्यावेळी कोणतेही नियुक्तीपत्र देण्यात आले नाही. या सर्वांना नोटीस पाठवून प्रशिक्षणासाठी त्रिपूराची राजधानी अगरतळा येथे जाण्यास सांगण्यात आले. त्यानंतर हे कर्मचारी प्रशिक्षण पूर्ण करून आले. मात्र त्यानंतर अवघ्या दोन महिन्यातच कुठलीही पूर्वसूचना न देता, यातील एक एक करून सर्व मास्टर ट्रेनर्सना काढून टाकण्यात आले. याविरोधात त्यांनी 17 मे 2019 ला मॅटमध्ये धाव घेतली, मॅटने या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याचे आदेश दिले, मात्र अद्यापही त्यांना कामावर घेतले जात नसल्याने त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे.

हेही वाचा - आता बोला.. रुग्णाची अँटीजेन चाचणी पॉझिटिव्ह तर आरटीपीसीआर निगेटिव्ह

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.