ETV Bharat / state

दारु तीच केवळ बाटली बदलली - अ‌ॅड. वामनराव चटप - address rally at dhaba chandrapur

प्रचारसभेतून चटप यांनी सत्ताधारी आणि विरोधकांना चांगलेच चिमटे काढले. सरकारला जाब विचारण्यास विरोधक अपयशी ठरले आहेत. फडणवीस सरकार खोटारड्यांची फौज आहे, अशी बोचरी टीका चटपांनी केली.

अ‌ॅड. वामनराव चटप
author img

By

Published : Oct 11, 2019, 4:18 PM IST

Updated : Oct 11, 2019, 4:46 PM IST

चंद्रपूर - भाजप सरकार म्हणजे "दारु तीच केवळ बाटली बदलली" अशी टीका स्वतंत्र भारत पक्षाचे उमेदवार अ‌ॅड. वामनराव चटप यांनी केली. सत्ताधारी भाजप सरकारने अनेक आश्वासने दिली. मात्र, दिलेल्या आश्वसनांची पुर्तता केली नाही. सरकारचे निर्णय शेतकऱ्यांसाठी मारक ठरले आहेत. काँग्रेसच्या काळात शेतकरी आत्महत्या झाल्याच पण भाजपच्या काळातही आत्महत्यांचा आकडा कमी झालेला नाही. गोंडपिपरीच्या धाबा येथील प्रचार सभेत ते बोलत होते.

अ‌ॅड. वामनराव चटप

हेही वाचा - हाताच्या सोबतीला "घड्याळ" दिसेना, राजूरा मतदारसंघात आघाडीत बिघाड?

राजूरा विधानसभेचे वातावरण तापू लागले आहे. नेत्यांच्या गावभेटींना वेग आला आहे. शेतकरी संघटना पुरस्कृत स्वतंत्र भारत पक्षाचे उमेदवार अ‌ॅड. वामनराव चटप यांनी संतनगरी अशी ओळख असलेल्या धाबा येथे प्रचाराचा नारळ फोडला. प्रचारसभेतून चटप यांनी सत्ताधारी आणि विरोधकांना चांगलेच चिमटे काढले. सरकारला जाब विचारण्यास विरोधक अपयशी ठरले आहेत. फडणवीस सरकार खोटारड्यांची फौज आहे. अशी बोचरी टिका चटपांनी केली.

हेही वाचा - अर्थमंत्री मुनगंटीवार यांची पत्रकार परिषद; भाजप-सेनेच्या आमदारांना निवडून देण्याचे आवाहन

दरम्यान, या सभेसाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती नागपुरच्या रंजना मामर्डे, शशिकांत देशकर, सतिश दाणी, राजेश कवटे, तुकेश वानोडे हे उपस्थित होते.

Intro:दारु तिच,बाटली बदलली

शेतकरी नेते ॲड.चटप सत्ताधारी,विरोधकावर बरसले

गोंडपिपरी MHC10013

सत्ताधारी भाजप सरकारने अनेक आश्वासने दिलीत. मात्र आश्वसनाची पुर्तता केली नाही. सरकारचे निर्णय शेतकऱ्यांसाठी मारक ठरले आहेत. काँग्रेसच्या काळात शेतकरी आत्महत्या झाल्यात,भाजपाचा काळातही आत्महत्यांचा आकडा कमी झालेला नाही. भाजपा सरकार म्हणजे " दारु तिच केवळ बाटली बदलली " .अशी टिका स्वतंत्र भारत पक्षाचे उमेदवार ॲड.वामनराव चटप यांनी केली. ते धाबा येथिल प्रचार सभेत बोलत होते.

राजूरा विधानसभेचे वातावरण हळूवार तापु लागले आहे. नेत्यांचा गावभेटीला वेग आला आहे. शेतकरी संघटना समर्थित ,स्वतंत्र भारत पक्षाचे उमेदवार ॲड.वामनराव चटप यांनी संतनगरी अशी ओळख असलेल्या धाबा येथे प्रचाराचे नारळ फोडले. प्रचारसभेतून ॲड.चटपांनी सत्ताधारी,विरोधकांचे चांगलेच चिमटे काढले. सरकारला जाब विचारण्यास विरोधक अपयशी ठरले .फडणविस सरकार खोटारड्यांची फौज आहे, अशी बोचरी टिका ॲड.चटपांनी केली.
विदर्भ राज्य आंदोलन समिती नागपुरचा रंजना मामर्डे,शशिकांत देशकर,सतिष दाणी,राजेश कवटे,तुकेश वानोडे मंचावर उपस्थित होते.Body:विडीओ..
प्रचारसभेत बोलतांना ॲड.वामणराव चटपConclusion:
Last Updated : Oct 11, 2019, 4:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.