ETV Bharat / state

देवदर्शनासाठी गेलेल्या वाहनाचा भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू

author img

By

Published : Feb 20, 2020, 1:47 AM IST

Updated : Feb 20, 2020, 9:32 AM IST

भरधाव स्कॉर्पिओ ट्रकवर आदळल्याने सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल मार्गावरील नागाळा-केसलाघाट दरम्यान ही दुर्घटना घडली. अपघातात सात जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.

स्कॉर्पिओ-ट्रकचा भीषण अपघात
स्कॉर्पिओ-ट्रकचा भीषण अपघात

चंद्रपूर - जिल्ह्यातील मूल मार्गावरील नागाळा-केसलाघाट दरम्यान भरधाव स्कॉर्पिओ ट्रकवर आदळल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर सातजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना मूल येथील उप जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

देवदर्शनासाठी गेलेल्या वाहनाचा भीषण अपघात

भरधाव स्कॉर्पिओ मोटारीने मार्गावर थांबलेल्या ट्रकला मागून धडक दिली. या अपघातातील मृत गोंदिया येथे देवदर्शनाला गेले असल्याची माहिती आहे. हे सर्व लोक चंद्रपूर येथील रहिवाशी आहेत. गोंदिया येथे देवदर्शनाहून येताना हा अपघात झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना मूल येथील उप जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. अपघात इतका गंभीर होता की, जवळपास अर्धी स्कार्पिओ गाडी ट्रकच्या मागील बाजूमध्ये घुसली. मृतांमध्ये संभाजी भोयर, कुसूम भोयर, जियान भोयर (दीड वर्ष), दत्तू झोडे, मीनाक्षी झोडे, शशिकला वांढरे अशी मृतांची नावे आहेत. तर जखमींमध्ये जितेंद्र पटपल्लीवार, मनीषा भोयर, अंकिता पेटकुले, क्रिश पाटील, सोमी पाटील, शीला पाटील, रेखा खटिकर यांचा समावेश आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Last Updated : Feb 20, 2020, 9:32 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.