चंद्रपूर - कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे. या काळात जमावबंदी करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत देखील आम आदमी पार्टीच्या वतीने बुधवारी एक अनोखे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन एकत्रित न जमता ऑनलाईन व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आले. या माध्यमातून सामान्य नागरिकांचे वीजबिल माफ करावे, ही मागणी करण्यात आली.
आम आदमीच्या या आंदोलनात हजारो कार्यकर्त्यांसह नागरिकांनीही सहभाग नोंदवला. '#वीज_बिल_माफ_करा' हा हॅश टॅग वापरून राज्यभर ट्विटरवर हजारो नागरिकांचे व्हिडिओ अपलोड करण्यात आले. तसेच फेसबुक, व्हाट्सअपवरून सुद्धा हे आंदोलन झाले. चंद्रपूर जिल्हा आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सुनिल मुसळे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांना निवेदन देण्यात आले.
हेही वाचा - शटर बंद करून नाश्ता देणे पडले महागात; हॉटेल मालकाला दोन हजारांचा दंड
हेही वाचा - जमावाची फळ व्यापाऱ्यांना मारहाण; चंद्रपूर बाजार समितीमधील प्रकार