चंद्रपूर - शिराना नदीच्या पुलाखाली पट्टेदार वाघ दोन दगडात फसला असल्याचे आज आढळून आले. हा वाघ मंगळवारी रात्रीपासून फसलेला असावा,असा प्रत्यक्ष अंदाज आहे. वाघाची यातून सुटका करण्यासाठी वनविभाग घटनास्थळी पोचले आहेत. ही घटना माजरी कोळसा खानीच्या चारगाव कोळसा खाणीजवळ घडली.
भद्रावती तालुक्यातील शिराना नदीच्या पुलाखाली पट्टेदार वाघ दोन दगडात फसलेला आज आढळला. हा वाघ मंगळवारी रात्रीपासून फसलेला असावा असा अंदाज आहे. हा वाघ जिथे अडकला आहे तो अत्यंत जोखमीचा भाग आहे. जवळच नदी असल्याने पाण्याच्या जवळ वाघाला गुंगीचे औषध देऊ शकत नाही. वाघ कालपासून येथे अडकला आहे त्यामुळे तो अत्यंत क्षीण झाला आहे. तसेच त्याला गंभीर दुखापत झाली असल्याचीही दाट शक्यता आहे. त्यामुळे या वाघाला सुखरूप वाचविण्याचे मोठे आव्हान वनविभागाचे आहे. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोचले असून वाघाला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.