ETV Bharat / state

Electric Scooter : चंद्रपुरातील तरुणाने भंगारातील दुचाकीपासून बनवली इलेक्ट्रिक स्कूटर

author img

By

Published : Feb 3, 2022, 4:57 PM IST

Updated : Feb 3, 2022, 5:34 PM IST

चंद्रपूर जिल्ह्यातील एका ध्येयवेड्या तरुणाने वडिलांच्या गॅरेजमध्ये धूळ खात पडून असलेल्या स्कूटरचे रुपांतर इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये केले आहे. यासाठी त्याला केवळ 70 हजार रुपयांचा खर्च आला असून एकदा चार्ज केल्यास ही स्कूटर शंभर किलोमिटरपर्यंत धावू शकते. या स्कूटरची बॅटरी चार्ज होण्यासाठी विजेचे केवळ चार युनिट लागतात. ज्याचा खर्च फक्त 35 ते 40 रुपये आहे. राकेश पेटकर, या तरुणाने तयार केलेल्या या स्कूटरची चर्चा सर्वत्र असून अनेक जण आपले दुचाकीचे रुपांतर ई-बाईकमध्ये करुन देण्याचा प्रस्ताव राकेशकडे करत आहेत.

छायाचित्र
छायाचित्र

चंद्रपूर - इंजिनिअरिंग झाली की युवक थेट नोकरीच्या मागे लागतात. मात्र, सर्वसामान्यांप्रमाणे इंजिनिअरिंग झाल्यानंतरही ध्येयवेड्या तरुणाने गलेलठ्ठ पगाराच्या मागे लागला नाही. चार वर्षे सातत्याने परिश्रम करून वाट्टेल ते प्रयोग केले आणि चंद्रपूरच्या रँचोने अखेर वीजेवर चालणारी दुचाकी ( Electric Scooter ) बनवून दाखवली. राकेश पेटकर, असे या रँचोचे नाव आहे. त्याने तयार केलेली स्कूटर फक्त चार युनिटमध्ये तब्बल 100 किलोमीटर धावते. त्याच्या या प्रयोगाचे सर्वत्र कौतूक तर होतच असून अशी स्कूटर तयार करून देण्यासाठी अनेक ऑफरही त्याला येत आहेत.

चंद्रपुरातील तरुणाने भंगारातील दुचाकीपासून बनवली इलेक्ट्रिक स्कूटर

आपल्या ध्येयालाच बनवले करिअर - राकेश पेटकर हा मूळचा गडचांदूर येथील असून त्याने चंद्रपूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली. 2018 मध्ये उत्तीर्ण झाल्यावर त्याचे सर्व वर्गमित्र चांगली नोकरी मिळविण्यासाठी धडपडू लागले. मात्र, राकेशने तसे केले नाही. वडिलांचे घरी गॅरेज होते त्यामुळे मशीन, इंजिन, गाड्यांचे आधीपासूनच त्याला प्रेम होते. त्याच्या आवडीला उच्चतांत्रिक शिक्षणाची जोड मिळाली. यातच काही करण्याचा निर्धार त्याने केला. वडिलांनीही त्याच्या या संकल्पाला साथ दिली.

गॅरेजमधील भंगार झालेल्या दुचाकीवर प्रयोग करण्याचा वडिलांचा सल्ला - इंधनसाठे मर्यादित असल्याने इलेक्ट्रिक वाहनेच उद्याच्या वाहनांचे भविष्य आहे असे मान यावर राकेशने आपले लक्ष केंद्रीत केले. ओरिसा राज्यातील भुवनेश्वर येथील सेंच्युरी विद्यापीठाच्या स्काय राईडर इन्स्टिट्यूटमधून 'ऑटोमोबाईल डिझायनिंग ऍण्ड मॅन्युफॅक्चरिंग' या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. यानंतर त्याच्या प्रयत्नांना आणि प्रयोगांना आणखी बळ मिळाले. 2020 मध्ये टाळेबंदी सुरू झाली. त्यानंतर त्याने कृषी तंत्रज्ञानावर पहिला प्रयोग केला. फवारणी यंत्रासाठी लीड ऍसिड बॅटरीचा उपयोग होतो. त्याजागी त्याने लिथियम आयन बॅटरीचा प्रयोग केला. याने फवारणी यंत्राची क्षमता आणि शक्ती वाढली. यानंतर त्याने दुचाकीवर हा प्रयोग करण्याचे सुरू केले. नव्या गाडीवर प्रयोग करण्यापेक्षा गॅरेजमधील भंगार झालेल्या ( Scrap Vehicle ) दुचाकीवर हा प्रयत्न करण्याचा सल्ला त्याच्या वडिलांनी दिला. जुन्या बजाजच्या स्कूटरचे रुपांतर इलेक्ट्रिकल स्कूटरमध्ये ( Electric Scooter ) करण्याचे प्रयोग सुरू झाले. अनेक महिने हे प्रयोग सुरू होते. तांत्रिक अडचणी आल्यास वर्गमित्र आणि भुवनेश्वर येथील शिक्षक त्याला मार्गदर्शन करीत होते.

केवळ 70 हजारांत यशस्वी प्रयोग - गाडीचे इंजिन काढून त्यात उच्च प्रतीची एक हजार वॅटची हब मोटर त्यात बसवली जी टायरसोबत जोडलेली असते. सोबत त्याला लिथियम आयन बॅटरी जोडली. जी सध्या वापरण्यात येणाऱ्या लीड ऍसिड बॅटरीपेक्षा दुप्पट क्षमतेची आहे. केवळ 70 हजारात राकेशने भंगार झालेल्या स्कूटरला ( Scrap Vehicle ) ई-स्कूटर बनवण्याचा हा प्रयोग यशस्वी झाला. बाजारात हेच वैशिष्ट्य असलेल्या स्कूटरची किंमत दीड लाखांच्या घरात आहे. त्याचा हा प्रयोग आता पंचक्रोशीतील चर्चेचा विषय ठरला आहे. अनेकजण त्याला आपल्या आपल्या गाड्यांचे रुपांतर ई-बाईकमध्ये करण्यासाठी मागणी करत आहेत. काही प्रस्ताव त्याने स्वीकारले असून त्यावर काम सुरू केले आहे. स्कूटरमध्ये हा प्रयोग करण्यापेक्षा बाईकवर हा प्रयोग करणे सोपे आहे, असे राकेश सांगतो. भविष्यात त्याला यशस्वी उद्योजक बनायचे आहे. आता यातच करिअर करण्याचे त्याने ठरवले आहे.

  • ही आहे या बाईकची खासियत
  • एकाच चार्जिंगवर ही बाईक तब्बल 100 किलोमीटर धावते.
  • बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी केवळ विजेचे चार युनिट लागतात. ज्याचा खर्च अवघे 35 ते 40 रुपये एवढा आहे.
  • बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी केवळ साडेचार तास एवढा वेळ लागतो.
  • एकदा चार्ज करून ही बाईक वापरली नाही तरी त्याची चार्जिंग ही तब्बल दोन महिने टिकते.

हेही वाचा - Tadoba Tiger Reserve : आनंदाची बातमी! 'या' तारखेपासून ताडोबा पर्यटनाला होणार पुन्हा सुरुवात

Last Updated : Feb 3, 2022, 5:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.