ETV Bharat / state

राष्ट्रीय शालेय मैदानी स्पर्धेसाठी चंद्रपूरनगरी सज्ज, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री येणार - शाल्मली खेालगडे

National School Sports Tournament : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे २७ ते ३१ डिसेंबर या कालावधीत राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांचं आयोजन होणार आहे. या स्पर्धेत देशभरातील सुमारे ३००० खेळाडू सहभागी झाले आहेत.

National School Sports Tournament
National School Sports Tournament
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 26, 2023, 7:57 PM IST

पाहा व्हिडिओ

बल्लारपूर (चंद्रपूर) National School Sports Tournament : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुका क्रीडा संकुलात ६७ व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा होत आहेत. बुधवारी (२७ डिसेंबर) या स्पर्धेचं उद्घाटन होईल. या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच संस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती असेल. या स्पर्धेत देशभरातील सुमारे ३००० खेळाडू सहभागी झाले आहेत.

लेजर शोसह अक्रोबॅटची मेजवानी : २७ डिसेंबरला सायंकाळी ५.३० वाजता स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे. उद्घाटन समारंभात फायर शो, लेझर शो, ॲक्रोबॅटिक डान्ससह विविध सांस्कृतिक कार्यक्रम मुख्य आकर्षण असतील. २७ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. राष्ट्रीय स्पर्धेच्या निमित्तानं चंद्रपूर आणि बल्लारपूर नगरीचा चेहरामोहरा बदललेला दिसतोय. शहरातील विविध चौकांचं सौंदर्यीकरण करण्यात आलंय. यासह विविध संकल्पनावर आधारित रंगबेरंगी चित्रांनी भिंती फुलल्या आहेत.

शाल्मली खोलगडेचा 'लाइव्ह शो' : २७ डिसेंबरला होणाऱ्या मुख्य उद्घाटन सोहळ्यात प्रसिद्ध सिनेगायिका शाल्मली खेालगडे हिचा लाइव्ह संगीत परफॉर्मन्स आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ६.३० वाजता हा शो होईल. यासोबतच फायर शो, लेझर शो, अक्रोबाईट डान्स आणि ढोल ताशांचा गजर करण्यात येणार आहे.

३०० लोककलावंतांचा सहभाग : यावेळी महाराष्ट्राच्या लोक संस्कृतीचं दर्शन घडवणारा शिववंदना आणि महाराष्ट्राची लोकधारा हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. यात सुमारे ३०० लोककलावंत सहभागी होतील. या कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचं दर्शन घडेल. यासह उपस्थितांना गणेशवंदना, जागर गोंधळ, शाहिरी, भक्ती-शक्ती संगम, कोळी नृत्य आणि शिवराज्यभिषेक सोहळ्याचं सादरीकरणही पाहता येणार आहे.

हे वाचलंत का :

  1. चंद्रपुरात वाघांचं मृत्यूसत्र सुरुच; दीड महिन्यात तब्बल सात वाघांचा मृत्यू
  2. चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या 72 शाळा अंधारात; जिवती तालुक्यातील 37 शाळांचा समावेश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.