ETV Bharat / state

चंद्रपूर जिल्ह्यात 3 नव्या कोरोनाग्रस्तांची भर ; एकूण संख्या 121

author img

By

Published : Jul 6, 2020, 10:58 AM IST

रविवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 121 वर गेली आहे. सध्या 59 बाधितांवर वैद्यकीय उपचार सुरू असून सर्व बाधितांची प्रकृती स्थिर आहे.

चंद्रपूर कोरोना अपडेट
चंद्रपूर कोरोना अपडेट

चंद्रपूर - जिल्ह्यात आणखी 3 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे संक्रमित झालेल्या बाधितांची संख्या 121 झाली आहे. यापूर्वीचे 62 बाधित कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.सध्या 59 बाधितांवर वैद्यकीय उपचार सुरू असून सर्व बाधितांची प्रकृती स्थिर आहे.

जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार ऊर्जाग्राम येथील 35 वर्षीय महिला कर्मचारी यांचा काल घेतलेला स्वॅब पॉझिटिव्ह आला आहे. त्यापाठोपाठ त्यांचे 40 वर्षीय पतीचा देखील अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच त्यांच्या कुटुंबातील अन्य तिघांचा देखील स्वॅब घेण्यात आला आहे.

दरम्यान चिमूर तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्हची पहिली घटना पुढे आली आहे. तालुक्‍यातील सोनेगाव येथील 35 वर्षीय नागरिक पॉझिटिव्ह आला आहे. नागपूर येथून परतल्यानंतर 1 जुलैपासून संस्थात्मक विलगीकरणात असणाऱ्या या नागरिकाचा स्वॅब 2 जुलैला घेण्यात आला होता. या 3 नागरिकांमुळे रविवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील पॉझिटिव्ह संख्या 121 वर गेली आहे.

मे ते जुलैपर्यंत कोरोना रुग्णांची नोंद पुढीलप्रमाणे - 2 मे ( एक बाधित ), 13 मे ( एक बाधित), 20 मे ( एकूण 10 बाधित ), 23 मे ( एकूण 7 बाधित ) , 24 मे ( एकूण 2 बाधित ) , 25 मे ( एक बाधित ) , 31 मे ( एक बाधित ), 2 जून ( एक बाधित ), 4 जून ( दोन बाधित ), 5 जून ( एक बाधित ), 6 जून ( एक बाधित ), 7 जून ( एकूण 11 बाधित ) , 9 जून ( एकूण 3 बाधित ) , 10 जून ( एक बाधित ) , 13 जून ( एक बाधित) , 14 जून ( एकूण 3 बाधित ) , 15 जून ( एक बाधित ) , 16 जून ( एकूण 5 बाधित ) , 17 जून ( एक बाधित ) , 18 जून ( एक बाधित ), 21 जून ( एक बाधित ) , 22 जून ( एक बाधित ), 23 जून ( एकूण 4 बाधित ) , 24 जून ( एक बाधित ), 25 जून ( एकूण 10 बाधित ) , 26 जून ( एकूण 2 बाधित ) , 27 जून ( एकूण 7 बाधित ) , 28 जून ( एकूण 6 बाधित ) , 29 जून ( एकूण 8 बाधित ) , 30 जून ( एक बाधित ) , 1 जुलै ( 2 बाधित ) , 2 जुलै ( 2 बाधित ) , 3 जुलै ( 11 बाधित ) , 4 जुलै ( एकूण 5 ) , 5 जुलै ( एकूण 3 बाधित) जिल्हा आरोग्य यंत्रणेने ही माहिती दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.