ETV Bharat / state

मृत बिबट्या, अस्वलांसोबत काढले चक्क 'सेल्फी', चंद्रपुरातील किसळवाणा प्रकार - मृत बिबट्या सेल्फी

चंद्रपुरच्या आयुध निर्माणी परिसरातील जंगलात विजेच्या धक्क्याने दोन बिबटे आणि दोन अस्वलांचा मृत्यू झाला आहे. परंतू या मृत वन्यजीवांसोबत सेल्फी काढण्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे.

chandrapur
मृत बिबट्या, अस्वलांसोबत सेल्फी काढण्याचा किळसवाणा प्रकार, चंद्रपुरात असंवेदनशिलतेचा कळस
author img

By

Published : Feb 3, 2020, 11:20 AM IST

चंद्रपूर - भद्रावती तालुक्यातील आयुध निर्माणी परिसरात दोन बिबटे आणि दोन अस्वलांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. ही दुर्दैवी घटना घडली असताना या ठिकाणी असंवेदनशीलतेचा कळस बघायला मिळाला. एका व्यक्तीने या मृत वन्यजीवांसोबत सेल्फी काढण्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. हा अत्यंत चीड आणणारा प्रकार असून, याबाबत आता सर्वस्तरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. हा व्यक्ती नेमका कोण आहे याचा शोध घेण्यात येत आहे.

मृत बिबट्या, अस्वलांसोबत सेल्फी काढण्याचा किळसवाणा प्रकार, चंद्रपुरात असंवेदनशिलतेचा कळस

हेही वाचा - चंद्रपूर : विजेचा शॉक लागून दोन अस्वलांसह दोन बिबट्यांचा मृत्यू, आयुध निर्माणी परिसरातील घटना

रविवारी आयुध निर्माणी परिसरात बिबट्यांचे आणि अस्वलांचे जोडपे मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या परिसरात उच्च दाबाची '11 केव्ही'ची विद्युत तार गेली होती. शिकारीसाठी तार टाकून हा फास लावण्यात आला होता. विशेष म्हणजे आयुध निर्माणिचा परिसर हा पूर्वी जंगलाचाच एक भाग होता. त्यामुळे येथे अजूनही वन्यजीवांचा मोठया प्रमाणात वावर आहे. गेल्या काही दिवसांपासून येथे बिबट्या आणि अस्वलांचे दर्शन होत होते.

हेही वाचा - चंद्रपुरात पतीवर गुन्हा दाखल केल्याने पत्नीने पोलीस ठाण्यातच घेतले विष

एकाच घटनेत चार दुर्मिळ वन्यजीवांचा बळी जातो ही अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक बाब आहे. मात्र, यात एका व्यक्तीने या मृत जनावरांसोबत सेल्फी काढल्याचे समोर आले आहे. वनाधिकारी घटनास्थळी येण्यापूर्वीच या व्यक्तीने सेल्फी काढले. येथे वन्यजीव संघटनेचे पदाधिकारी पोहोचले असताना देखील हा व्यक्ती आपली सेल्फी काढत होता. अखेर त्याला हटकल्यानंतर तो तेथुन परतला अशी माहिती मिळत आहे. हे अत्यंत दुर्दैवी असून या व्यक्तीचा आता शोध घेतला जात आहे.

Intro:चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील आयुध निर्मानी परिसरात दोन बिबट आणि दोन अस्वलांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. इतकी दुर्दैवी घटना घडली असताना या ठिकाणी असंवेदनशीलतेचा कळस बघायला मिळाला. यात एका व्यक्तीने या मृत वन्यजीवासह सेल्फी काढण्याचे फोटोसेशनच करून घेतले. हा अत्यंत लज्जास्पद प्रकार असून याबाबत आता सर्वस्तरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. हा व्यक्ती नेमका कोण आहे याबाबतचा शोध घेण्यात येत आहे.

काल आयुध निर्माणी परिसरात बिबट आणि अस्वलाचे जोडपे मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या परिसरात उच्च दाबाची 11 केव्हीही जी विद्युत तार गेली होती त्यावरून तार टाकून हा फास लावण्यात आला होता. शिकार करण्याचा यामागचा हेतू होता. विशेष म्हणजे आयुध निर्माणिचा परिसर हा पूर्वी जंगलाचाच एक भाग होता. त्यामुळे येथे अजूनही वन्यजीवांचा मोठया प्रमाणात वावर आहे. गेल्या काही दिवसांपासून येथे बिबट आणि अस्वलांचे दर्शन होत होते. त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एकाच घटनेत चार दुर्मिळ वन्यजीवांचा बळी जातो ही अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक बाब आहे. मात्र, यात एका व्यक्तीने या मृत जनावरांसोबत वेगवेगळ्या मुद्रेत सेल्फी काढल्याचे समोर आले आहे. वनाधिकारी घटनास्थळी येण्यापूर्वीच या व्यक्तीने आपले सेल्फी काढून घेतले होते. येथे वन्यजीव संघटनेचे पदाधिकारी पोचले असताना देखील हा व्यक्ती आपली सेल्फी काढण्यासाठी लुडबुड करीत होता. अखेर त्याला हटकल्यानंतर तो तेथुन परतला अशी माहिती मिळत आहे. हे अत्यंत दुर्दैवी असून या व्यक्तीचा आता शोध घेतला जात आहे.Body:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.