चंद्रपूर - कोरोना विषाणूचा राज्यात संसर्ग वाढत आहे. असे असताना चंद्रपूर येथे ११ विदेशी नागरिक हे पर्यटक व्हिसा घेऊन आणि २ परराज्यातील भारतीय नागरिकांसहीत चंद्रपुर येथील छोटी मस्जिद येथे आले होते. चंद्रपुर येथे आल्यानंतर या विदेशी नागरिकांनी जिल्ह्यातील इतर ठिकाणी प्रवास करुन व्हिसा आणि प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लघंन केले होते. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता. तत्पुर्वी त्यांना विलगीकरन कक्षात ठेवण्यात आले होते. हा कालावधी पूर्ण होताच त्यांना अटक करून न्यायालयात नेण्यात आले. जिल्हा न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.
हेही वाचा... मंदिरातच दोन साधूंची निर्घृण हत्या, धारदार हत्यारासह नशेबाज युवक पोलिसांच्या ताब्यात
काही विदेशी नागरिक तुकुम येथील मशिदीत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी केलेल्या कारवाईत तेथे 13 जण आढळून आले. यात 11 जण तुर्कस्तान तर दोन जण परराज्यातून आलेले होते. चौकशी केली असता त्यांच्याकडे पर्यटक व्हिसा असल्याचे आढळून आले. त्यांनी व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले.
त्यानुसार 5 एप्रिलला त्यांच्या विरोधात विदेशी नागरिक कायदा आणि साथ रोग प्रतिबंधक कायदा, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. यानंतर त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. 29 एप्रिलला त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला असता त्यांना न्यायालयात हजर केले गेले. तेव्हा न्यायालयाने सदर आरोपींना जामीन मंजूर केला आहे.