ETV Bharat / state

पाण्याचं बिल भरण्या इतकेही पैसे मंत्र्यांकडे नाहीत का ? विरोधी पक्षनेते होताच कडाडले वड्डेटीवार - apposition leader

आज सभागृहात विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी विजय वड्डेटीवार यांची निवड झाली. सभागृह सुरू झाल्यापासून गेले काही आठवडाभर हे पद रिक्त होते. माझा पक्ष सत्तेत आल्याशिवाय मी स्वस्थ राहणार नाही, असे सांगत वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

विजय वड्डेटीवार
author img

By

Published : Jun 24, 2019, 5:17 PM IST

मुंबई - सभागृहात आज विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी विजय वड्डेटीवार यांची निवड झाली. काँग्रेसचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, बविआ व इतर पक्ष यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी आभार मानले. सभागृह सुरू झाल्यापासून गेले काही आठवडाभर हे पद रिक्त होते. अखेर माझी निवड झाली, पुढील संपूर्ण आठवडा खूप काम आहे. अधिवेशनाचा कालावधी कमी असून निवडणूकाही तोंडावर आल्या आहेत. ही आव्हान असून 20- 20 मॅच सारख काम करावं लागेल अशी प्रतिक्रिया वड्डेटीवार यांनी व्यक्त केली.

विजय वड्डेटीवार

माझा पक्ष सत्तेत आल्याशिवाय मी स्वस्थ राहणार नाही. महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेचा या सरकारच्या विरोधात आक्रोश आहे. राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न,बेरोजगारी वाढत आहे. 1100 जागांसाठी 14 लाख लोकांनी अर्ज केले आहेत.

माजी विरोध पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षिरसागर यांना युती सरकारमध्ये मंत्रीपद दिले आहे. याबाबत आम्ही उच्च न्यायालयात आव्हान दिले असून उच्च न्यायालयात आज त्याबाबत सुनावणी झाली आहे. न्यायालयाने विरोधकांना त्याबाबत नोटीस काढली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाचे पाण्याचे बिल भरले नाही. जनता पाण्याच्या थेंबासाठी व्याकुळ झाली असताना हे आंघोळीसाठी लाखो लिटर पाणी वापरत आहे. मंत्र्याच्या बंगल्यातील पाण्याचे बिल भरण्या इतपत सरकारकडे पैसे नाहीत का, असा सवाल वड्डेटीवार यांनी व्यक्त केला.

Intro:आज सभागृहात विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. याबद्दल काँग्रेसचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, बुविका व इतर पक्ष यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी आभार मानले. सभागृह सुरू झाल्यापासून गेले आठवडाभर हे पद रिक्त होते. अखेर माझी निवड झाली, पुढील संपूर्ण आठवडा खूप काम आहे. अधिवेशनाचा कालावधी कमी असून निवडणूकाही तोंडावर आल्या आहेत. ही आव्हान असून 20- 20 मॅच सारख काम करावं लागेल अशी प्रतिक्रिया वड्डेटीवार यांनी व्यक्त केली.

Body:माझा पक्ष सत्तेत आल्याशिवाय मी स्वस्थ राहणार नाही. महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेचा या सरकारच्या विरोधात आक्रोश आहे. राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न,बेरोजगारी वाढत आहे. 1100 जागांसाठी 14 लाख लोकांनी अर्ज केले आहेत.
माजी विरोध पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षिरसागर यांना युती सरकारमध्ये मंत्रीपद दिले आहे. याबाबत आम्ही उच्च न्यायालयात आव्हान दिले असून उच्च न्यायालयात आज त्याबाबत सुनावणी झाली आहे. न्यायालयाने विरोधकांना त्याबाबत नोटीस काढली आहे.

Conclusion:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाचे पाण्याचे बिल भरले नाही. जनता पाण्याच्या थेंबासाठी व्याकुळ झाली असताना हे आंघोळीसाठी लाखो लिटर पाणी वापरत आहे. मंत्र्याच्या बंगल्यातील पाण्याचे बिल भरण्या इतपत सरकारकडे पैसे नाहीत का असा सवाल वड्डेटीवार यांनी व्यक्त केला.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.