ETV Bharat / state

नामांकित कॉस्मेटीक कंपनीची कोट्यवधींची फसवणूक, २ आरोपींना अटक

बेला कंपनीचा माल तुम्ही परत करा आणि रिसिव्ह कॉपी द्या, असे केल्यास ग्राहकांना त्याच्या मोबदल्यात फॉरेन टूरचे आमिष दिले जायचे.

आरोपी
author img

By

Published : Apr 10, 2019, 12:41 PM IST

मुंबई - नामांकित कॉस्मेटिक कंपनीची कोट्यवधी रूपयांची फसवणूक करुन कंपनीची उत्पादने बाहेर कमी किंमतीत विकणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांच्या आर.ए.के मार्ग पोलिसांनी छडा लावला आहे. गेल्या काही महिन्यात अटक झालेल्या आरोपींनी फसवणूक करुन कोटींमध्ये पैसे कमावल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

वरीष्ठ पोलीस निरीक्षक विवेक जीवने माहिती देताना

निलेश दुबे आणि रुणीत शहा अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेजण बेला कंपनीत सेल्समन पदावर काम करत होते. कॉस्मेटिक उत्पादनाच्या ग्राहकांना हे दोघे सांगायचे की, बेला कंपनीचा माल तुम्ही परत करा आणि रिसिव्ह कॉपी द्या, असे केल्यास ग्राहकांना त्याच्या मोबदल्यात फॉरेन टूरचे आमिष दिले जायचे. ग्राहकांकडून परत घेतलेला माल ते कंपनीला परत न देता परस्पर लालजी गुप्ता आणि अन्वर खान या दोघांना विकत होते.

पोलीस तापासत आतापर्यंत या टोळीने १ कोटी १० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. मात्र, या गुन्ह्यात आणखीन काहीजण अडकले असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार पुढील तपास सुरू आहे.

Intro:नामांकित कॉस्मेटिक कंपनीची कोट्यावधी रूपयांची फसवणूक करून कंपनीची उत्पादने बाहेर कमी किमतीत विकणाऱ्या टोळीचा छडा मुंबई पोलिसांच्या आर ए के मार्ग पोलिसांनी लावला आहे. गेल्या कहाणी महिन्यात अटक आरोपीनी या गुन्ह्यातून करोडो रुपये जमविल्याचे पोलीस तापासत समोर आले आहे. Body:देशातल्या नामांकित कॉस्मेटिक कंपनीच्या सौदर्य उत्पादने हातोहात लांबवून काळ्या बाजारात अतिशय स्वस्तात विकून करोडो रुपये कमविणारया 2 आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे. निलेश दुबे आणि रुणीत सहा अशी अटक आरोपींची नाव असून हे दोघे बेला कंपनीत
सेल्समन पदावर काम करीत होते. कॉस्मेटिक उत्पादनाच्या ग्राहकांना हे दोघेही सांगायचे की बेला कंपनीचा माल तुम्ही परत करा आणि रिसिव्ह कॉपी द्या. असे केल्यास ग्राहकांना त्याच्या मोबदल्यात त्यांना फॉरेन टूरच ते आमिष द्यायचे. ग्राहकांकडून परत घेतलेला माल ते कंपनी ला परत न देता परस्पर लालजी गुप्ता आणि अनवर खान या दोघांना विकत होते. Conclusion:पोलीस तापासत आता पर्यंत या टोळीने 1 कोटी 10 हजार रुपयांची फसवणूक केल्याच समोर आलं आहे. मात्र करोडो रुपयांच्या या गुन्ह्यात आणखीन काही जण अडकले असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार पुढील तपास सुरू आहे.

बाईट: विवेक जीवने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आरएके मार्ग पोलीस ठाणे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.