ETV Bharat / state

CCTV: प्रवाशाचे पाकीट मारून पळणाऱ्या चोरट्याच्या आवळल्या मुसक्या, मुंब्रा रेल्वे पोलिसांची कामगिरी - मुंबई

'चोर चोर, पकडा पकडा'च्या आवाजाने सतर्क झालेल्या आरपीएफ जवानाने पाकीट मारून पळून जाणाऱ्या चोराला पकडले.

सीसीटीव्ही
author img

By

Published : Apr 9, 2019, 9:34 AM IST

मुंबई - 'चोर चोर, पकडा पकडा'च्या आवाजाने सतर्क झालेल्या आरपीएफ जवानाने पाकीट मारून पळून जाणाऱ्या चोराला पकडले. रामदुलारे चव्हाण हा जवान मुंब्रा रेल्वे स्थानकावर सेवा बजावत होता. त्याने पळून जाणाऱ्या चोरट्याला मोठ्या कौशल्याने पकडले. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याबद्दल रामदुलारेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आरपीएफ अधिकारी आनंद यादव यांची प्रतिक्रिया

रेल्वे स्थानकावर होणाऱ्या गर्दीचा फायदा अनेक भुरटे चोर घेतात. ७ एप्रिल रोजी मुंब्रा रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक २ वर उस्मानाबाद येथून आलेल्या ३२ वर्षीय विठ्ठल कांबळे यांचे पाकीट मारून चोर गर्दीतून पळून जावू लागला. आपले पाकीट गेले, हे लक्षात येताच विठ्ठल यांनी 'चोर चोर पकडा पकडा' असा आरडाओरडा सुरू केला. गर्दीतून वाट काढत पळणाऱ्या चोराला तेथेच असणाऱ्या आरपीएफ जवान रामदुलारे चव्हाणांची नजर गेली.

त्यांनी पळणाऱ्या चोराला जवळ येताच घट्ट मिठी मारून धरली. चोराने ती मिठी सोडविण्यासाठी प्रयत्न केले. परंतु, चव्हाण यांनी त्याला सोडले नाही. उबेद सलीम खान असे या २२ वर्षीय चोरट्याचे नाव आहे. जीवन बाग मुंब्रा येथील तो रहिवासी आहे. तपासणीत त्याच्याकडे विठ्ठल कांबळे यांचे चोरलेले पाकीट आढळून आले. प्रसंगावधान राखून एका चोराला जेरबंद करून आपले कर्तव्य बजावणाऱ्या रामदुलारे चव्हाण यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Intro:मुंब्रा रेल्वे पोलिसांची जबरदस्त कामगिरी, प्रवेशाचे पाकीट मारून पळणाऱ्या चोरट्याच्या आवळल्या मुसक्या ..... Body:

"चोर चोर, पकडा पकडा "  च्या आवाजाने सतर्क झालेल्या आरपीएफ जवानाने पाकीट मारून पळून जाणाऱ्या चोराला शिताफीने पकडून सगळ्यांची वाहवा मिळवली आहे. रामदुलारे चव्हान हा जवान मुंब्रा रेल्वे स्थानकात सेवा बजावत असताना पळून जाणाऱ्या चोरट्याला मोठ्या कौशल्याने पकडले. हा संपूर्ण थरार cctv कॅमेऱ्यात कैद झाल्याने रामदुलारे चे सर्वत्र कौतुक होत आहे.  मुंबई आणि उपनगरांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच जात असून लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या रेल्वेला देखील प्रचंड गर्दी होत असते आणि याच गर्दीचा फायदा अनेक भुरटे चोर देखील घेताना दिसतात. अशीच एक घटना दिनांक सात एप्रिल रोजी मुंब्रा रेल्वे स्थानक फलाट क्र २ वर घडली ज्यात उस्मानाबाद येथून आलेल्या ३२ वर्षीय विठ्ठल कांबळे यांचे पाकीट मारून गर्दीतून पळून जाऊ लागला. आपले पाकीट गेले हे लक्षात येताच विठ्ठल यांनी "चोर चोर पकडा पकडा " असा आरडाओरडा सुरु केला. गर्दीतून शिताफीने वाट काढत पळणाऱ्या या चोरावर तेथेच आपले कर्तव्य बजावत असलेल्या रामदुलारे चव्हाण या आरपीएफ जवानांची नजर गेली. त्याने पाळणाऱ्या चोराचा एकंदरीत अंदाज घेत, तो जवळ येताच त्याला घट्ट मिठी मारून धरली. चोराने ती मिठी सोडविण्यावही शिकस्त केली परंतु चव्हाण याने त्याला जेरबंद केले. उबेद सलीम खान असे या २२ वर्षीय चोरट्याचे नाव असून तो जीवन बाग मुंब्रा येथील रहिवासी आहे. त्याची तपासणी केली असता विठ्ठल कांबळे यांचे त्याने चोरलेले पाकीट आढळून आले. प्रसंगावधान राखून एका चोराला जेरबंद करून आपले कर्तव्य बजावणाऱ्या रामदुलारे चव्हान याचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

BYTE - आनंद यादव आरपीएफ पोलीस अधिकारी Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.