मुंबई - लोकल रेल्वेने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना पावसाळ्यात धबधब्याचा शोध घेण्यासाठी मुंबई बाहेर जाण्याची गरज नाही. तुम्ही जर दऱ्या खोऱ्यात जाऊन धबधब्यात वर्षाविहार करण्याचा विचार करीत असाल तर मध्य रेल्वेच्या विक्रोळी रेल्वे स्थानकाला पावसामध्ये जरुर भेट द्या. इथल्या फलाटावरील धबधबा सध्या ओसंडून वाहत आहे.
मुंबईमध्ये अनेक रेल्वेस्थानकाच्या फलाटावरील गळक्या व नादुरुस्त छताच्या डागडुजीसाठी काही महिने झाले काम चालू आहे. त्यामुळे काही फलाटावरचे काम पूर्ण झाली आहेत, तर काही अपूर्ण आहेत. यातच विक्रोळी रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 4 वरील छताचे काम अपूर्ण असल्यामुळे मुंबईत कोसळत असलेल्या मुसळधार पाऊस यामुळे धबधबा सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच पावसामुळे उशीरा धावत असल्याचा फटकाही लाखो प्रवाशांना बसत आहे. लोक खोळंबून फलाटावरच उभे असतात त्यात हा गळणारा फलाट त्रासदायक होत आहे. रेल्वे स्थानकावर पावसामध्ये प्रवाशांना आपल्या नियोजित स्थळी जाण्यासाठी लोकल रेल्वे मिळत नाही. त्यामुळे रेल्वे स्थानकावर एकच गर्दी उसळते, यातून दुर्घटनेला आमंत्रण दिले जात आहे.
पावसामुळे फलाटावर गर्दी होत असल्याने मागील वर्षी एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावर पायऱ्यावरून खाली उतरताना मोठी जीवितहानी झाली होती. त्यामुळे रेल्वे तर्फे घाटकोपर, मुलुंड, विक्रोळी , कुर्ला व हार्बर व पश्चिम रेल्वेवर जुने छत व पायऱ्या काढून नवीन बनवण्याचे काम चालू असल्याचे पाहायला मिळत आहे.
लोकल रेल्वेने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना पावसाळ्यात धबधब्याचा शोध घेण्यासाठी मुंबई बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर मध्य रेल्वेच्या विक्रोळी रेल्वे स्थानकाला पावसामध्ये भेट द्या मनसोक्त धबधबा सध्या ओसंडून वाहत आहे. मुंबईमध्ये अनेक रेल्वेस्थानकाच्या फलाटावरील गळक्या व नादुरुस्त छताच्या डागडुजीसाठी काही महिने झाले काम चालू आहे. त्यामुळे काही फलाटावरचे काम पूर्ण झाले तर काही अपूर्ण आहेत. यातच विक्रोळी रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 4 वरील छताचे काम अपूर्ण असल्यामुळे मुंबईत कोसळत असलेल्या मुसळधार पाऊस आणि रेल्वेचा उशीर होत असलेला कारभार अशा वेळी फटका रेल्वे फलाटावरील रोज लाखो प्रवास करणाऱ्यांना सहन करावा लागत आहे. रेल्वे स्थानकावर पावसामध्ये प्रवाशांना आपल्या नियोजित स्थळी जाण्यासाठी लोकल रेल्वे मिळत नाही. त्यामुळे रेल्वे स्थानकावर एकच गर्दी फलाटावर प्रवाशी करतात आणि दुर्घटनेला आमंत्रण दिले जाते.
पावसामुळे फलाटावर गर्दी होत असल्याने मागील वर्षी एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावर पायऱ्यावरून खाली उतरताना मोठी जीवित हानी झाली होती.त्यामुळे रेल्वे तर्फे घाटकोपर ,मुलुंड विक्रोळी ,कुर्ला व हार्बर व पश्चिम रेल्वेवर जुने छत व पायऱ्या काढून नवीन बनवण्याचे काम चालू असल्याचे पहायला मिळत आहे.