मुंबई - काँग्रेसचे दिवंगत नेते आणि चित्रपट अभिनेते सुनील दत्त यांची कन्या प्रिया दत्त यांनी आज प्रभादेवी येथील सिद्धीविनायकाचे दर्शन घेऊन लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरला. प्रिया दत्त या उत्तर मध्य मुंबईच्या माजी खासदार आहेत.
-
आज उत्तर मध्य मुंबई संसदीय क्षेत्र से अपना नामांकन दाखिल करते समय मुझे मिले प्यार और जन समर्थन से अभिभूत हूँ।
— Priya Dutt (@PriyaDutt_INC) April 8, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
आइए एक मज़बूत लोकतंत्र, सुदृढ़ अर्थव्यवस्था, शांति और स्वतंत्रता के मूल्यों की दिशा में काम करें।
जय हिन्द।@duttsanjay @naseemkhaninc @BabaSiddique @thekripashankar pic.twitter.com/Rks9TlmX1Y
">आज उत्तर मध्य मुंबई संसदीय क्षेत्र से अपना नामांकन दाखिल करते समय मुझे मिले प्यार और जन समर्थन से अभिभूत हूँ।
— Priya Dutt (@PriyaDutt_INC) April 8, 2019
आइए एक मज़बूत लोकतंत्र, सुदृढ़ अर्थव्यवस्था, शांति और स्वतंत्रता के मूल्यों की दिशा में काम करें।
जय हिन्द।@duttsanjay @naseemkhaninc @BabaSiddique @thekripashankar pic.twitter.com/Rks9TlmX1Yआज उत्तर मध्य मुंबई संसदीय क्षेत्र से अपना नामांकन दाखिल करते समय मुझे मिले प्यार और जन समर्थन से अभिभूत हूँ।
— Priya Dutt (@PriyaDutt_INC) April 8, 2019
आइए एक मज़बूत लोकतंत्र, सुदृढ़ अर्थव्यवस्था, शांति और स्वतंत्रता के मूल्यों की दिशा में काम करें।
जय हिन्द।@duttsanjay @naseemkhaninc @BabaSiddique @thekripashankar pic.twitter.com/Rks9TlmX1Y
प्रिया दत्त यांनी सकाळी आई-वडिलांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. मागील निवडणुकीप्रमाणे यावेळीही त्यांनी सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी प्रभादेवी येथील सिद्धीविनायक मंदिरात जाऊन श्रीगणेशाचे दर्शन घेतले. यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाधीस्थळ असलेल्या दादर येथील चैत्यभूमी येथे अनेक कार्यकर्त्यांसह त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधी स्थळाला अभिवादन केले.
उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात असलेल्या देवी-देवतांचे दर्शन घेऊन स्थानिकांचेही आशीर्वाद घेतले. यासोबतच मतदारसंघातील विविध धर्मीय धार्मिक स्थळांना त्यांनी भेटी दिल्या. बाबा मगदूम शहा दर्ग्यात चादर चढवून अनेक मुल्ला मौलवी यांचेही आशीर्वाद घेतले. त्यांनी माउंट मेरी चर्चला जाऊन प्रभू येशू आणि मरियम यांच्यापुढे प्रार्थना केली. यानंतर शेकडो कार्यकर्त्यांसह वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयात जावून त्यांनी उमेदवारी अर्ज भरला.