मुंबई - नवमतदारांची तसेच तरुणांची संख्या लक्षात घेता भाजप व काँग्रेसने रॅप गाण्यांमधून प्रचार करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे इन्स्टाग्राम, फेसबुकसारख्या सोशल मीडियामध्ये हे व्हिडिओ प्रचाराचा धुरळा उडविताना दिसत आहेत.
लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली आहे. तरुणांईमध्ये सोशल मीडियाची चांगलीच क्रेझ आहे. त्यामुळे जाहिराती, पोस्टर यांच्याबरोबरच समाज माध्यमांचा प्रभावी वापर राजकीय पक्षांकडून होत आहे. याचाच एक भाग म्हणून भाजपने काही दिवसांपूर्वीच ट्विटरवर नरेंद्र मोदींवर असलेले एक गाणे अपलोड केले आहे. ये बंदा अपना सही है! असे हे रॅप गाणे आहे. तसेच काँग्रेसने काँग्रेस है ना, हे गाणे तयार करून तरुणाईला आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न केला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="https://youtu.be/313nuAAdXcc">https://youtu.be/313nuAAdXcc
सोशल मीडियावरील प्रचाराला आले महत्त्व-
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा भाजपने अत्यंत कल्पकतेने वापर केला होता. त्यानंतर भाजपला लोकसभेत बहुमत मिळाले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदीही सोशल मीडियावर सक्रिय असतात. यापूर्वी सोशल मीडियावर फारसे सक्रिय नसलेल्या काँग्रेस पक्षानेही रॅप गाण्यामधून प्रचारात आघाडी घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="https://www.instagram.com/tv/BtoT5MoFAL3/?utm_source=ig_share_sheet&igshid=1tctgsw9sb2l4">https://www.instagram.com/tv/BtoT5MoFAL3/?utm_source=ig_share_sheet&igshid=1tctgsw9sb2l4
आपला पक्ष कसा श्रेष्ठ हे सांगत बनवलेली रॅप गाणी सोशल मीडियावर संबंधित पक्षांच्या समर्थकांमध्ये लोकप्रिय होत आहेत. रॅप गाण्यामध्ये एक रॅपर दुसऱ्या रॅपर हिणवण्यासाठी त्याच्याबद्दल गाण्यातून वाईट बोलतो. याला 'डीस ट्रॅक' म्हणतात. हाच वापर करत राजकीय पक्ष प्रतिस्पर्धी पक्षाला गाण्यामधून कमी लेखताना दिसत आहेत. गल्ली बॉयच्या लोकप्रियतेनंतर रॅप गाण्यांनी तरुणाईला भुरळ घातली. याचा फायदा घेण्यात राजकीय पक्ष किती यशस्वी ठरले आहेत, हे निकालानंतरच समजू शकणार आहे.