ETV Bharat / state

मुंबईतली निशका आयपॅडवर देणार बारावीची परीक्षा

मुंबई विभागातून १ हजार ८५५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

author img

By

Published : Feb 21, 2019, 9:47 AM IST

निशका नरेश हसनगडी

मुंबई - सोफिया महाविद्यालयातील निशका नरेश हसनगडी ही विद्यार्थिनी बारावीची परीक्षा आयपॅडवर देणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून परवानगी देण्यात आली आहे. यासोबतच तिला एक लेखनिकही देण्यात आला आहे.

राज्यभरात आजपासून १२ वीची परीक्षा सुरू होणार आहे. निशका दिव्यांग असून तिला लहानपणापासूनच लिहिता येत नाही. तिने दोन वर्षांपूर्वीही दहावीची परीक्षा आयपॅडवर दिली होती. यावेळीही निशकाआयपॅडवर उत्तर लिहिणार असून, एक लेखनिक आयपॅडवर टाईप केलेले उत्तर उत्तरपत्रिकेवर लिहणार आहे. त्यानुसार मंडळाने या विद्यार्थिनीच्या परीक्षेबाबतची माहिती परीक्षा केंद्राकडे पाठविली असून, योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेशही दिले आहेत.

उद्या होत असलेल्या परीक्षेला अध्यन अक्षम, दिव्यांग आदीतील तब्बल मुंबई विभागातून १ हजार ८५५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. विशेष विद्यार्थ्यांना परीक्षेत समान संधी मिळावी, या उद्देशाने राज्य शिक्षण मंडळाकडून संगणक पुरविणे, अतिरिक्त वेळ देणे आणि लेखनिक पुरविणे, अशा विविध सुविधा दिल्या जात आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत यंदा वाढ झाली आहे.

Intro:मुंबईतील सोफिया देणार आयपॅडवर बारावीची परीक्षाBody:मुंबईतील सोफिया देणार आयपॅडवर बारावीची परीक्षा
मुंबई, ता. २० :
अध्ययन अक्षम' आणि विशेष विद्यार्थी म्हणून ओळख असलेल्या सोफिया महाविद्यालयातील निशका नरेश हसनगडी ही विद्यार्थीनी उद्या बारावीची परीक्षा आयपॅडवर देणार आहे. त्यासाठी मंडळाकडून एक लेखनिकही देण्यात आला आहे. राज्य शिक्षण मंडळाने त्यासाठी तिला परवानगी दिली असून ती उद्या सर्वांचे लक्ष वेधणार आहे.
निशका नरेश हसनगडी हिला लहानपणापासूनच लिहिता येत नाही. तरीही तिने दहावीची परीक्षा उत्तीर्ण होऊन बारावीपर्यंत पोचली आहे. उद्यापासून सुरू होत असलेल्या बारावीच्या परीक्षेत तिला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आयपॅडवर बारावीची परीक्षा देण्यास परवानगी दिली आहे. यापूर्वी तिने दोन वर्षांपूर्वी दहावी परीक्षाही आयपॅडवर दिली होती. परीक्षेत निकशा ही आयपॅडवर उत्तर लिहिणार असून, एक लेखनिक आयपॅडवर टाईप केलेले उत्तर उत्तरपत्रिकेवर लिहणार आहे. त्यानुसार मंडळाने या विद्यार्थिनीच्या परीक्षेबाबतची माहिती परीक्षा केंद्राकडे पाठविली असून, योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेशही दिले आहेत.
दरम्यान, उद्या होत असलेल्या परीक्षेला अध्यन अक्षम, दिव्यांग आदीतील तब्बल मुंबई विभागातून 1 हजार 855 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. विशेष विद्यार्थ्यांना परीक्षेत समान संधी मिळावी, या उद्देशाने राज्य शिक्षण मंडळाकडून संगणक पुरविणे, अतिरिक्त वेळ देणे, लेखनिक पुरविणे अशा विविध सुविधा दिल्या जातात. यासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत यंदा वाढ झाली आहे.
बारावीची परीक्षा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्याने परीक्षा केंद्रात परीक्षेच्या पूर्वी अर्धा तास अगोदर उपस्थित राहणे बंधनकारक आहे. त्यांना या परीक्षेत देण्यात येणाऱ्या प्रश्नपत्रिका आणि त्याचे आकलन होण्यासाठी परीक्षेच्या नियोजित वेळेपूर्वी 10 मिनिटे अगोदर प्रश्‍नपत्रिका देण्यात येणार असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले.
Conclusion:मुंबईतील सोफिया देणार आयपॅडवर बारावीची परीक्षा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.