ETV Bharat / state

मोदी सरकारने क्लिनचिटसाठी कॅगचा वापर केला-जयंत पाटील

'राफेलमध्ये घोटाळा झाला नसेल, तर तो कॅगमध्ये मांडण्याची गरज काय,' असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. 'कॅगने एखाद्या मंत्र्याचे किंवा खात्याचे कौतुक केले आहे, असे आजपर्यंत कधीच घडले नाही,' असे ते म्हणाले.

author img

By

Published : Feb 13, 2019, 8:41 PM IST

जयंत पाटील

मुंबई - मोदी सरकारने देशात पहिल्यांदाच कॅगच्या अहवालाचा 'वापर' स्वतःला क्लिनचिट देण्यासाठी केला आहे. राफेल खरेदीच्या वेळी जे वित्त विभागाचे सचिव होते, त्यांचा अर्थातच व्यवहारात सहभाग होता. त्यांनीच हा कॅगचा अहवाल तयार केला असल्याने यातून मोदी यांनी आपला बचाव करून घेतला, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आज केला.

'कॅग अहवालाबाबत बोलायचे तर, आतापर्यंत राज्यात आणि देशातही सर्वांनीच कॅगचे अनेक अहवाल बघितले आहेत. पण पहिल्यांदाच कॅगच्या अहवालामध्ये एखाद्या विभागाचे असे कौतुक करताना पाहिले आहे. सरकारने केलेल्या कामांचा आढावा घेणे व त्यात काही आक्षेपार्ह असेल, भ्रष्टाचार असेल तर ते समोर आणणे, हे कॅगचे काम असते,' असे राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना संगितले.

आजपर्यंत कॅगने चांगले काम झाल्याचे सांगितलेले नाही, असेही ते म्हणाले. 'राफेलमध्ये घोटाळा झाला नसेल, तर तो कॅगमध्ये मांडण्याची गरज काय,' असा सवाल त्यांनी केला. 'कॅगने एखाद्या मंत्र्याचे किंवा खात्याचे कौतुक केले आहे, असे आजपर्यंत कधीच घडले नाही,' असे ते म्हणाले. मोदी सरकार सर्व स्वायत्त यंत्रणांचा 'उपयोग' करून घेत आहे, असा आरोप पाटील केला.

undefined

Intro:मोदी सरकारने क्लिनचिटसाठी कॅगचा वापर केला-जयंत पाटीलBody:मोदी सरकारने क्लिनचिटसाठी कॅगचा वापर केला-जयंत पाटील

(मोजोवर यासाठीचा बाईट पाठवला आहे)
मुंबई ता. 13:
देशात पाहिल्यादा कॅगचा अहवाल स्वतःला क्लिनचिट देण्यासाठी मोदी सरकारने केला आहार. ज्या राफेल खरेदीच्या वेळा वित्त विभागाचे सचिव होते, ज्यांचा त्यात सहभाग होता, त्यांनीच हा कॅगचा अहवाल तयार केला असल्याने यातून मोदी यांनी आपला बचाव करून घेतला असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी आज केला.
राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना संगितले की,कॅग अहवालाबाबत आतापर्यंत राज्यात आणि देशातही आपण कॅगचे अनेक रिपोर्ट बघितले आहेत. पण असा पहिल्यांदाच कॅगच्या अहवालामध्ये मध्ये एखाद्या विभागाचे कौतुक करताना पाहिले आहे. कॅगचे काम असते की, सरकारने केलेल्या कामांचा आढावा घेणे व त्यात काही आक्षेपार्ह असेल, भ्रष्टाचार असेल तर ते समोर आणणे. आजपर्यंत कॅगने चांगले काम झाल्याचे सांगितलेले नाही असेही प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील म्हणाले. राफेलमध्ये घोटाळा झाला नसेल तर तो कॅगमध्ये मांडण्याची गरज काय ? असा सवाल करतानाच कॅग एखाद्या मंत्र्यांचं किंवा खात्याचं कौतुक केले आहे. आजपर्यंत असे कधीच घडलेच नाही असेही प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी सांगितले.
मोदी सरकार सर्व स्वायत्त यंत्रणेचा उपयोग करून घेत आहे असा आरोपही पाटील यांनी करत मोदींवर निशाणा साधला.
Conclusion:मोदी सरकारने क्लिनचिटसाठी कॅगचा वापर केला-जयंत पाटील
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.