बुलडाणा - येथे 28 मार्चला एका 46 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्याच्या घशातील स्वॅब चाचणीचा नागपूर येथून पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आरोग्य यंत्रणा व जिल्हा प्रशासनाने त्या कुटुंबासह परिसरातील 60 व्यक्तींना तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. त्यांच्या चाचणीचा अहवाल आल्यानंतर यातील दोन जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यानंतर या मृत रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांपैकी रविवारी रात्री 60 पैकी 24 तर, दुसर्या दिवशी सकाळी पुन्हा आठ नमुने तपासणीसाठी नागपूरला पाठविण्यात आले होते. त्यातील एकूण 32 नमुन्यांपैकी 30 मार्चला सायंकाळी 20 नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. मात्र, आज (मंगळवार) सकाळी पुन्हा त्यातील 3 नमुन्यांचे अहवाल आले असून 'त्या' कोरोना पॉझिटिव्ह मृतकाच्या परिवरातीलच आणखी 2 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांनी दिली आहे. तर, अजून 9 नमुन्यांचे अहवाल येणे बाकी आहे.
शनिवारी 27 मार्चला सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना आयसोलेशन कक्षात एका 45 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर रविवारी 28 मार्चला नागपूरहून या रुग्णाचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला. जिल्हा प्रशासनाने सतर्क होवून महत्वाचे निर्णय घेत संपूर्ण बुलडाणा शहराला लॉकडाऊन करून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण राहत असलेल्या परिसराला रेड झोनमध्ये घेवून त्या व्यक्तीच्या संपर्कातील लोकांची माहिती घेतली.
यानंतर, रविवारी रात्री त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 60 पैकी 24 तर, दुसर्या दिवशी सकाळी पुन्हा आठ नमुने तपासणीसाठी नागपूरला पाठविण्यात आले. चाचणीसाठी पाठवण्यात आलेल्या एकूण 32 नमुन्यांपैकी 30 मार्च ला सायंकाळी 20 नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. तर, आज (मंगळवार) सकाळी पुन्हा त्यातील 3 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून 'त्या' कोरोना पॉझिटिव्ह मृतकाच्या परिवरातीलच आणखी 2 जणांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यामुळे, मृतक आणि कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती राहत असलेला परिसर पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. तसेच, नगर परिषदेच्या साहाय्याने रेड झोनच्या परिसरात 40 आरोग्य सेवकांचे पथक स्थापन करून परिसरातील रहवासी यांची चौकशी केली जात आहे.