बुलडाणा - लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शेगांव येथील श्री संत गजानन महाराजांचा आज १४३ वा प्रगटदिन आहे. या निमित्ताने शेगावात दरवर्षी लाखो भाविक पोहचतात. मात्र, सध्या कोरोनाच्या प्रादुर्भामुळे राज्यातील धार्मिकस्थळांवर निर्बंध घालण्यात आले असल्याने शेगावचे मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे यावर्षीचा प्रगटदिनोत्सव मंदिरात अंतर्गत कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. दरम्यान, आज शुक्रवारी पहाटेपासूनच मंदिराच्या प्रवेशद्वारावर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. प्रवेशद्वारावरच माथा टेकून भाविक नतमस्तक झाले.
यंदाच्या प्रगटदिनोत्सवात भाविकांचा सहभाग नाही -
सध्या बुलढाणा जिल्ह्यात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचे निर्देशे प्रशासनातर्फे देण्यात आले आहे. विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगावच्या संत श्री गजानन महाराजांचा प्रगटदिन यावर्षी मंदिरातील अंतर्गत कार्यक्रमांनी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे.
हेही वाचा - देवेंद्र फडणवीस यांच्यावर आक्षेपार्ह आरोप करणाऱ्या 'त्या' व्यक्तीला बेड्या