ETV Bharat / state

बुलडाण्यात चोरीच्या वाहनासह अवैधरित्या शस्त्रे बाळगणाऱ्या तीन जणांना अटक - स्थानीक गुन्हे शाखा बुलडाणा

चोरीच्या वाहनाने फीरून अवैधरित्या शस्त्रे बाळगणाऱ्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने अटक केली आहे.

बुलडाण्यात तीन जणांना अटक
बुलडाण्यात तीन जणांना अटक
author img

By

Published : Dec 19, 2020, 7:19 PM IST

बुलडाणा - चोरीच्या वाहनाने फीरून अवैधरित्या शस्त्रे बाळगणाऱ्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने अटक केली आहे. यावेळी एका आरोपीच्या ताब्यातून सहा हजार रुपये किंमतीची तलावार, सोळा हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा एकुण सोळा हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. तर दुसऱ्या आरोपीकडून पन्नास हजार रुपये किंमतीची गावठी पिस्तुल, पाचशे रुपये किंमतीचे पाच जीवंत काडतुसे, तीस हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल, असा एकुण ८२ हजार ५०० रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. तर तिसऱ्या आरोपीच्या ताब्यातून पन्नास हजार रुपये किंमतीची दुचाकी असा एकुण तीन आरोपीकडून १ लाख ४८ हजार ५०० रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी १४ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास बोराखेडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली आहे.

बुलडाण्यात तीन जणांना अटक
अवैधरित्या शस्त्रे विकणाऱ्यांना आळा घालण्याचे आदेश-

जिल्ह्यात अवैधरित्या शस्त्रे विकणाऱ्यांना आळा घालण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया यांना स्थानीक गुन्हे शाखेला दिले आहेत. या आदेशावरून स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक बळीराम गिते यांनी विविध पथके नियुक्त केली आहे. याद्वारे अवैधरित्या शस्त्रे विकणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. दरम्यान सोमवारी मोताळा तालुक्यातील बोराखेडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही इसम अवैध शस्त्रे व चोरीच्या वाहनासह फिरत असल्याची माहिती पथकाला मिळाली. या माहितीवरून पथकाने मोताळा तालुक्यात जावून एकास ताब्यात घेतले.

शेख राजीक शेख सुपडू (वय २७ रा. कुरेशी मोहल्ला), असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून सहा हजार रुपये किंमतीची लोखंडी तलवार व दहा हजार रुपये किंमतीचा एक मोबाईल, असा एकुण सोळा हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. तर दुसऱ्या माहितीवरून पोलिसांनी हिमांशु भिकमचंद झंवर (वय २५) यास ताब्यात घेतले. त्याची विचारपूस करून त्याच्या घराची झडती घेतली असता घरात पन्नास हजार रुपये किंमतीची गावठी पिस्तुल, पाचशे रुपये किंमतीचे पाच जीवंत काडतुसे, असा एकुण ८२ हजार ५०० रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे.

मोताळा बसस्थानकावर एकास अटक-

त्यानंतर एक इसम हा संशयीतरित्या दुचाकीने फिरत असल्याची माहिती पथकाला मिळाली. या माहितीवरून पथकाने मोताळा बसस्थानकावर जावून पाहणी केली. तर आरोपी त्या ठिकाणी आढळून आला. पंकज गजानन पाटील (वय २४ रा. वॉर्ड क्रमांक ९ मोताळा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. यावेळी त्याच्या ताब्यातून पन्नास हजार रुपये किंमतीची दुचाकी जप्त केली. एकुण तीन कारवाईमध्ये पोलीसांनी १ लाख ४८ हजार ५०० रुपयाचा माल जप्त केला आहे.

तीनही आरोपी विरुध्द गुन्हा दाखल-

या प्रकरणी तीनही आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करून त्यांना पुढील कारवाईसाठी बोराखेडी पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, अप्पर पोलीस अधिक्षक हेमराजसिंह राजपुत, खामगावचे अप्पर पोलीस अधिक्षक बजरंग बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक बळीराम गिते यांच्या आदेशानुसार नागेशकुमार चतरकर, निलेश शेळके, श्रीकांत जिंदमवार, अताउल्लाखान, गजानन आहेर, रघूनाथ जाधव, युवराज शिंदे, सतिष जाधव, वैभव मगर, गजानन गोरले, विजय वारुळे, विजय सोनवणे, नदीम शेख, महिला पोलीस कर्मचारी सरीता वाकोडे, राजू आडवे व चालक राहुल बोर्डे यांनी केली आहे.

हेही वाचा- Congress Meeting : राहुल गांधी पुन्हा बनू शकतात काँग्रेस अध्यक्ष, म्हणाले, पक्ष जी जबाबदारी देईल ती स्वीकारेन..

हेही वाचा- ...अशी दिसणार मुंबई-अमहमदाबाद बुलेट ट्रेन!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.