बुलडाणा - जिल्ह्यात एकूण 8 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर विजय मिळवल्यानंतर पुन्हा आज गुरुवारी 3 कोरोनाबाधित रुग्णांनी आरोग्य यंत्रणेच्या मदतीने कोरोनावर विजय मिळविला आहे. यामध्ये एक 5 वर्षीय चिमुकला, एक महिला आणि एका तरुणाला बुलडाण्याच्या स्त्री रुग्णालयातून 14 दिवसाच्या होम क्वारंटाईन अटीवर सुट्टी देण्यात आली आहे. सद्यपरिस्थितीत 9 कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद यांनी दिली आहे.
बुलडाणा जिल्हा स्त्री रुग्णालयात 21 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. काही दिवसापूर्वी 17 एप्रिलला 3 आणि 20 एप्रिलला 5 असे एकूण 8 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेऊन बरे होवून घरी परतले. आज (गुरुवारी) अजून 3 कोरोनाबाधितांना सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये शेगाव येथील आई आणि 5 वर्षीय लहान मुलगा तर खांमगाच्या एक रुग्णाचा समावेश आहे. यामुळे कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या आणखी 3 ने कमी होऊन ती 9 वर आली आहे.
जिल्हा स्त्री रुग्णालयात 12 जण उपचार घेत असलेल्यांपैकी तीन जणांना आज सूट्टी देण्यात आली आहे. या तीन जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याने त्यांना आज गुरुवारी सूटी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात फक्त 9 कोरोनाबाधित रुग्ण जिल्हयात उपचार घेत आहे. त्यांची प्रकृतीसुद्धा स्थिर असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांनी दिली आहे.
बुलडाण्यात पुन्हा तीन रुग्णांनी मिळवला कोरोनावर विजय; 5 वर्षीय चिमुकल्याचाही सहभाग
बुलडाणा जिल्हा स्त्री रुग्णालयात 21 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. काही दिवसापूर्वी 17 एप्रिलला 3 आणि 20 एप्रिलला 5 असे एकूण 8 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेऊन बरे होवून घरी परतले.