बुलडाणा - बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव सामान्य रुग्णालयात आयसोलेशन कक्षामध्ये परदेशातील त्या तीन कोरोना संशयीत रुग्णांना कोरोना नसल्याचे आलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यांच्या कोरोना संदर्भातील अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाले आहे.
मलेशिया आणि इंडोनेशियावरून आलेल्या तीन जणांना काही लक्षणे आढळल्याने तिन्ही रुग्णांना खामगाव येथील सामान्य रुग्णालय दाखल करून आयसोलेशन कक्षात उपचार सुरू करण्यात आले होते. या तिन्ही रुग्णांचे नमूने तपासणीसाठी नागपूर येथे पाठवण्यात आले असून त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यावरून हे तिन्ही रुग्ण निगेटिव्ह आले आहे.
हेही वाचा - बुलडाण्यात अवकाळी पावसासह गारपीट... पिकांचे नुकसान
कोरोनाबाबत नागरिकांनी भीती बाळगू नये, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. मात्र, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून स्वच्छता राखणे गरजेचे असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे.
हेही वाचा - कोरोनामुळे बुलडाण्याचा आठवडी बाजार रद्द, जिल्हा प्रशासनाचा निर्णय,