ETV Bharat / state

बुलडाण्यात १० वीच्या विद्यार्थिनीची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

प्रगती शेषराव मोरे असे विद्यार्थिनीचे नाव आहे. शुक्रवारी विज्ञान विषयाचा पेपर अवघड गेल्याने तिने हे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे

मृत प्रगती मोरे
author img

By

Published : Mar 16, 2019, 10:41 PM IST

बुलडाणा - खामगाव तालुक्यातील टेंभुर्णा येथील १० वीत शिकणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थिनीने राहत्या घरात शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्रगती शेषराव मोरे असे विद्यार्थिनीचे नाव आहे. शुक्रवारी विज्ञान विषयाचा पेपर अवघड गेल्याने तिने हे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. खामगाव ग्रामीण पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून नोंद घेतली आहे.

घटनेबद्दल माहिती देताना पोलीस

प्रगती ही इयत्ता १० वीमध्ये जागृती विद्यालयात शिकत होती. शुक्रवारी तिचा विज्ञान विषयाचा पेपर होता. मात्र, पेपर संपवून घरी आल्यावर तिने राहत्या घराच्या छताला असलेल्या लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेतला. आत्महत्या करण्यापूर्वी तिने स्वतःच्या हातावर आपण पेपर अवघड गेल्याने आत्महत्या करत आहोत, असे लिहून ठेवले होते. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला आहे. पेपर अवघड गेल्याने आत्महत्या करू नका, भविष्यात अजूनही पर्याय उपलब्ध आहेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Intro:बुलडाणा:- खांमगाव तालुक्यातील टेंभुर्णा येथील 10 वीत शिकणाऱ्या 16 वर्षीय विद्यार्थिनीने राहत्या घरात शुक्रवारी 15 मार्च रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना प्रकाशात आली आहे. प्रगती शेषराव मोरे असा विद्यार्थिनींचा नाव असून तिचा 10 वी चा शुक्रवारचा पेपर अवघड गेला म्हणून तिने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.खामगाव ग्रामीण पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून नोंद घेतलीय.. Body:बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील टेंभुर्णा येथील प्रगती मोरे ही इयत्ता 10 वित जागृती विद्यालयात शिकत होती.. शुक्रवारी 15 मार्च रोजी मृतक प्रगती चा विज्ञान चा 11 वाजेपासून तर 1 वाजपर्यंत पेपर होता.. मात्र पेपर संपवून घरी आल्यावर तिने राहत्या घराच्या छताला असलेलया लोखंडी अँगल ला ओढणीने गळफास घेतला आणि आपली जीवनयात्रा संपवली.. तर आत्महत्या करण्यापूर्वी तिने स्वतःच्या हातावर आपण पेपर अवघड गेल्याने आत्महत्या करीत आहोत ,असे लिहून ठेवलंय.. त्यामुळे गावात एकच खळबळ उडालीय.. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून मर्ग दाखल केलाय.. तर पोलिसांनी विद्यार्थ्यांना आवाहन ही केलेय की पेपर अवघड गेल्याने आत्महत्या करू नका ,भविष्यात अजूनही पर्याय उपलब्ध आहेत..

Byte:-रफिक शेख,पोलीस निरीक्षक, खामगाव..

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:null

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.