बुलडाणा - सख्ख्या भाचीवर सतत बलात्कार करणाऱ्या नराधम मामावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आरोपीला जिल्हा न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व दोन हजार रुपये दंड ठोठावला.
खामगावमधे राहणारी ही व्यक्ती 2015 पासून आपल्या सख्ख्या भाचीवर सतत बलात्कार करत होती. यामुळे पीडीत युवतीला गर्भधारणा होऊन तिने एका मुलीला जन्म दिला. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी मामावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. जन्माला आलेले बाळ आणि आरोपीची डीएनए चाचणी करण्यात आली. यावेळी आरोपी हा जन्मलेल्या बाळाचा पिता असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश आर.डी. देशपांडे 13 साक्षीदारांच्या साक्षीवरून आरोपीला दहा वर्षे कारावास व दोन हजार रुपये दंड ठोठावला. या प्रकरणात सरकारी वकील म्हणून ऍड.वसंत भटकर आणि ऍड. आपटे यांनी बाजू मांडली.
हेही वाचा - बिहार: पाटनामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार