ETV Bharat / state

बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करा, स्वाभिमानीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला बैलगाडी मोर्चा - बुलडाणा शहर बातमी

महाराष्ट्रात बंद असलेली बैलगाडा शर्यत सुरु करण्यात यावे, खिल्लार गोवंश वाचविण्यात यावे, शेतकऱ्यांची उन्नती करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मागण्या मान्य करण्यात याव्या, यासह इतर मागण्यांसाठी बुधवारी (11 ऑगस्ट) जिल्हाधिकारी कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने बैलगाडी मोर्चा काढण्यात आला

मोर्चा
मोर्चा
author img

By

Published : Aug 11, 2021, 5:27 PM IST

Updated : Aug 11, 2021, 6:20 PM IST

बुलडाणा - महाराष्ट्रात बंद असलेली बैलगाडा शर्यत सुरु करण्यात यावे, खिल्लार गोवंश वाचविण्यात यावे, शेतकऱ्यांची उन्नती करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मागण्या मान्य करण्यात याव्या, यासह इतर मागण्यांसाठी बुधवारी (11 ऑगस्ट) जिल्हाधिकारी कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.

बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते

या आहेत मागण्या

  • शेतकऱ्याला बैल व बैलजोडी खरेदीसाठी अनुदान देण्यात यावे.
  • हे अनुदान सर्व अल्पभूधारक व शेतमजूर यांना मिळावे.
  • सन 2016-17 च्या आदेशाची अमलबजावणी करण्यात यावे.
  • संविधानातील कलम 48 प्रमाणे राज्य सरकारने वन्य प्राणी, पक्षी याप्रमाणेच शेतकऱ्यांच्या जुपनीच्या जनावरांची यादी जाहीर करण्यात यावी.
  • संविधानातील 48 प्रमाणे जुपनीच्या जनावरांच्या वंशवृध्दीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून शासनमान्य प्रदर्शन भरवावी.
  • जुपनीच्या जनावरांच्या यादीत असणारा बैल असेल तर त्याला गाडी ओढणे, पोहणे तसेच इतर मेहनतीची कामे करण्यास परवानगी असावी.
  • संविधनातील कलम 48 नुसार बैल, गाय, वासरे यांना कत्तलखाण्यात कापण्याची परवानगी देऊ नये, असे कोठे आढळल्यास अशा व्यक्तींवर योग्य ती कारवाई करावी.
  • बैलाची शारीरीक क्षमता सिद्ध करुन तो पळू शकतो याचे परीक्षण करुन अहवाल तयार करण्यात याव्या.

...अन्यथा खिल्लार गोवंश चार वर्षात संपेल

संपूर्ण जगाला महाराष्ट्राची पशुधनामध्ये वेगळी ओळख निर्माण करुन देणारा महाराष्ट्रातील पांढरे सोने म्हणून प्रसिद्ध असलेला 'खिल्लार' हा गोवंश आहे. खिल्लार हा देशी गोवंश असल्याने त्याचे आयर्वेद शास्त्रात वेगळे महत्व आहे. अशा देशी खिल्लार गायी, बैल यांचे संगोपन करणे, प्रदर्शन करणे त्यांचे संरक्षण करने अशी संविधानात तरतूद आहे. जरी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आले असले तरी खिल्लार गाय व बैल हा महाराष्ट्रातील 90 टक्के शेतकऱ्यांचा प्राण आहे, जगण्याचे शेती इतकेच महत्वाचे साधन आहे. केंद्र सरकार सध्या ‘गाय बचाओ - देश बचाओ’ असे म्हणत असतांना महाराष्टात मात्र देशी गाय पूर्णपणे संपताना दिसत आहे. असेच चालू राहिले तर येणाऱ्या दोन ते चार वर्षात खिल्लार गाय व बैल संपविण्यात येईल व येणाऱ्या पिढीला तो फक्त चित्रात पाहावा लागेल, असे निवेदनात नमूद करून वरील मागण्या करण्यात आले आहे.

डफडे वाजत काढण्यात आला मोर्चा

स्वाभिमानी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या बैलगाडी मोर्चाची सुरुवात त्यांच्या सोसायटी पेट्रोलपंप समोरील जनसंपर्क कार्यालयापासून करण्यात आली. बैलगाडी, डफडे व आसपासच्या गावातील असंख्य बैलगाडी चालक-मालक या मोर्चात सहभागी झाले होते. हो मोर्चा चिखली रोडने सोसायटी पेट्रोल पंप चौक, त्रिशरण चौक, मोठी देवी, शहर पोलीस ठाणे, एडेड चौक, तहसील चौक, के स्क्वेअर चौक, स्टेट बँक चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी डफडे वाजवत, घोषणाबाजी करत, जिल्हाधिकारी परिसर दणाणून सोडला होता. यानंतर स्वाभिमानीनसंघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यासह बैलगाडी चालक मालकांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या मोर्चात रविकांत तुपकर, जि.प. सदस्य शरद हाडे, विदर्भ कार्याध्यक्ष राणा चंदन, पवन देशमुख, शब्बीर सेठ, राजू वाळके, सुखदेव गाडे, सतीश दांदडे, मनोज देशमुख, विजय नरोटे यांच्यासह असंख्य बैलगाडा चालक मालक या मोर्चात सहभागी झाले होते.

हेही वाचा - बुलडाणा मोटार वाहन निरीक्षकाचा पैसे घेतानाचा व्हिडीओ व्हायरल, प्रादेशिक परिवहन विभागाने दिले स्पष्टीकरण

Last Updated : Aug 11, 2021, 6:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.