ETV Bharat / state

नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त बुलडाण्यात राज्यस्तरीय साहीत्य संमेलनाचे आयोजन

नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त बुलडाण्यात 23 जानेवारीला एक दिवसीय राज्यस्तरीय साहीत्य संमेलन आयोजन करण्यात आले आहे.

ज्यस्तरीय साहीत्य संमेलनाचे आयोजन
author img

By

Published : Jan 22, 2021, 3:38 PM IST

बुलडाणा - नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त बुलडाण्यात 23 जानेवारीला एक दिवसीय राज्यस्तरीय साहीत्य संमेलन आयोजन करण्यात आले आहे. आझाद हिंद संघटनेच्या वतीने येथील कवीवर्य भगवान ठग साहित्यनगरी गर्दे सभागृहात हे संमेलन होणार आहे. संमेलन संयोजन समिती सदस्यांकडून आज पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील हे उपस्थीत असणार आहे. तर मुख्य संयोजक अ‌ॅड.सतीशचंद्र रोठे हे असणार आहे.

संमेलन आयोजन समिती

सुभाषचंद्र बोस यांचे विचार जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम-

गेल्या 25 वर्षापासून आझाद हिंद संघटनेमार्फत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे देशप्रेम बाबतचे विचार व त्यांनी देशाप्रती केलेली कामगिरी जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम केले जाते. दरम्यान, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवन चरित्राचे साहित्य संमेलन व्हावे. या हेतूने एक दिवसीय राज्यस्तरीय साहीत्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

साहित्यिकांना नेताजींच्या विचाराकडे आकर्षित करणारे संमेलन-

देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे विचार देशप्रेमाचे होते. 'आझाद हिंद फौज'ची स्थापना करून सुभाषबाबूंनी इंग्रजांना देशाबाहेर घालवण्यासाठी मौलिक कामगिरी केली. परंतु नेताजींवर म्हणावे तसे साहित्य येऊ शकले नाही. राज्यस्तरीय नेताजी जागर साहित्य संमेलन नेताजींच्या विचारांणा समर्पित असून त्यांच्या विचारांना उजाळा देऊन एक प्रकारे साहित्यिकांना नेताजींच्या विचाराकडे आकर्षित करणारे संमेलन असल्याने ते ऐतिहासिक देखील आहे, असे प्रतिपादन संमेलनाच्या कोषाध्यक्ष प्रा.शाहीनताई पठाण यांनी केले.

एक दिवसीय संमेलन आयोजन समिती सदस्यांनी पत्रकार परीषदेतून संवाद साधला. यावेळी साहित्यिक नरेंद्र लांजेवार, आयोजक तथा मुख्य संयोजक अ‌ॅड. सतिशचंद्र रोठे, सुरेश साबळे, गणेश निकम, संजय एंडोले, युवराज कापरे, आदेश कांडेलकर, श्रीकृष्ण कोकाटे, सुभाष निकाळजे आदि उपस्थित होते.

हेही वाचा- जादा व्याज आकारणाऱ्या एनबीएफसीवर कारवाई करा; राज ठाकरेंची आरबीआयकडे मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.