ETV Bharat / state

शासकीय भूखंडावर कोरोनाग्रस्त मुतदेहांचे अंत्यविधी करावे; समाजसेवक मोहम्मद अजहर यांची मागणी - बुलडाणा कोरोना न्यूज

शहरातील भर वस्तीत असलेल्या ठिकाणी कोरोनाग्रस्त मृतदेहाचा अंत्यविधी केल्या जात असल्याने कोरोनाच्या मृतदेहाच्या अंत्यविधीसाठी शासकीय भूखंडावर व्यवस्था करण्याची मागणी नगरसेविकेचे पती तथा समाजसेवक मोहम्मद अजहर यांनी प्रशासनाला केली आहे. यासंदर्भात त्यांनी तक्रार निवारण समितीच्यावतीने नोडल अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

buldana
शासकीय भूखंडावर कोरोनाग्रस्त मुतदेहांचे अंत्यविधी करावे;समाजसेवक मोहम्मद अजहर यांची मागणी
author img

By

Published : Jul 2, 2020, 6:38 PM IST

बुलडाणा - शहरात कोरोनाच्या मृतदेहाच्या अंत्यविधीसाठी शासकीय भूखंडावर व्यवस्था करण्याची मागणी नगरसेविकेचे पती तथा समाजसेवक मोहम्मद अजहर यांनी प्रशासनाला केली आहे. यासंदर्भात त्यांनी तक्रार निवारण समितीच्यावतीने नोडल अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

शासकीय भूखंडावर कोरोनाग्रस्त मुतदेहांचे अंत्यविधी करावे;समाजसेवक मोहम्मद अजहर यांची मागणी

शहरातील भर वस्तीत असलेल्या ठिकाणी कोरोनाग्रस्त मृतदेहाचा अंत्यविधी केल्या जात असल्याने भविष्यात परिसरातील नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती व्यक्त केल्या जात आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त मृतदेहाचा अंत्यविधी शासकीय जमीनीवर करण्याची मागणी समाजसेवक मोहम्मद अजहर यांनी केली.

22 जूनला जोहर नगरमधील स्मशानभूमीत रात्रीच्या वेळी कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृतदेह आणण्यात आला होता. शासकीय प्रोटोकॉलप्रमाणे वस्तीजवळ असलेल्या स्मशानभूमीत कोरोना रुग्णाचा अंत्यविधी करण्यात येत नाही. त्यामुळे, नागरिकांनी परिसरात तणावपूर्ण वातावरण तयार केले होता. यावेळी मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जावून सर्वांची समजूत काढली, आणि अंत्यविधी पार पडायला लावले.

त्यानंतर, पुन्हा 30 जूनला कोरोनाग्रस्त मृतदेहाचा जोहर नगरमधील स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आला. यावेळी मात्र जबाबदारीने सर्व कार्य पार पडले. मात्र अशाच प्रकारे कोरोनाग्रस्त मृतदेहांचे अंत्यविधी वस्ती असलेल्या ठिकाणी झाल्याने भविष्यात या वस्तीतील नागरिकांना कोरोनाची लागण होऊ शकण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

त्यामुळे, वस्ती नसलेल्या शासकीय खुल्या भूखंडावर अंत्यविधी करण्यासाठी व्यवस्था करावी अशी मागणी मोहम्मद अजहर, मोहम्मद दानिश, जुनेद चौधरी, इमरान चौधरी यांनी निवासी उपजिल्हाधिकारी पुरी यांच्याकडे एका अर्जाद्वारे केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.