बुलडाणा - बुलडाण्याचे जिल्हाधिकारी व अप्पर पोलीस अधिकाक्षकांच्या निवासस्थानी एकाच दिवशी मंगळवारी (30 जून) रात्री विषारी-बिनविषारी 2 सर्प निघाल्याची घटना घडली. सर्पमित्र श्रीराम रसाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या दोन्ही सापांना पकडून जीवदान दिले. एकाच दिवशी दोन्ही शासकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी सर्प निघाल्यामुळे चर्चा झाली.
अप्पर पोलीस अधिक्षक संदीप पखाले यांच्या निवासस्थानी मंगळवारी 30 जूनच्या रात्री 9 वाजण्याच्या दरम्यान एक सर्प आढळून आला. यावेळी कर्तव्यावर असणारे पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन सोनुने यांनी सर्पमित्र श्रीराम रसाळ यांना माहिती दिली. तर जिल्हाधिकारी सुमनचंद्रा यांच्या निवासस्थानी देखील रात्री 11 वाजता सर्प निघाल्याने पोलीस ना. प्रदिप मुसदवाले व होमगार्ड विनोद पायघन यांनी सर्पमित्र श्रीराम रसाळ यांना माहिती दिली. तत्काळ रसाळ व त्यांची टीम घटनास्थळी पोहोचली. त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षकांच्या निवास्थानातून विषारी जातीचा कोब्रा जातीचा सर्प तर जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानाहून बीन विषारी तस्कर जातीचा सर्प ताब्यात घेऊन दोघांना जंगलात सोडून जीवनदान दिले.