बुलडाणा - एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाणमध्ये दम नाही, अशी टीका करत आपल्या विभागात आल्यावर हिशोब विचारतो, अशा शब्दात शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी त्यांना आव्हान दिले आहे. एमआयएम पक्षाचे माजी आमदार वारिस पठाण यांनी कर्नाटकात एका सभेत वादग्रस्त वक्तव्य केले होते. यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरांतून टीका झाल्यानंतर त्यांनी माफी मागितली. तर त्यांनी माफी दबावापोटी मागितली. मात्र, त्यांच्या या वक्तव्यातून त्यांच्या पोटीतील जहर बाहेर आले, अशी टीकाही त्यांनी केली.
विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान अधिवेशनात उपस्थित केलेल्या विविध मुद्यांवर आधारित प्रश्नांसंदर्भात माहिती देण्यासाठी आज (शनिवारी) स्थानिक विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा - मराठा आरक्षणाबाबत उपसमितीची बैठक; १७ मार्चला सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी
काय म्हणाले आमदार संजय गायकवाड ?
'तू 15 कोटींची गोष्ट काय करतो. मी सोमवारी तुला विधानसभेत भेटतो. असे म्हणत आमदार गायकवाड यांनी पठाण यांना आव्हान दिले होते. तसेच माझ्या देशाचा प्रश्न आहे. मी विधानभवनच्या गेटवर उभे राहून पत्रकारांमार्फत आव्हान केले होते. त्याच्यात दम असता तर यायचे असते. तो नाही आला. तरी तो इकडे आपल्या विभागात तर येऊ द्या, त्याला हिशोब विचारतो', अशा शब्दात आमदार संजय गायकवाड यांनी जोरदार टीका केली.
वारिस पठाणांचे वादग्रस्त वक्तव्य -
‘आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचे असून ते मागून मिळत नसते, तर हिसकावून घ्यायचे असते. आता फक्त वाघिणी (मुस्लीम महिला) पुढे आल्या, तर तुम्हाला घाम फुटला. जर आम्हीही सोबत आलो, तर काय होईल? आपण १५ कोटी असून १०० कोटींना भारी पडू' असे वादग्रस्त विधान पठाण यांनी केले होते.