ETV Bharat / state

'मला कोरोनाचे जंतू सापडले असते, तर ते फडणवीसांच्या तोंडात कोंबले असते' - आमदार संजय गायकवाड

बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड हे नेहमी आपल्या वक्तव्यावरुन नेहमीच चर्चेत राहतात. यावेळी मात्र ते भाजप व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पातळी सोडून केलेल्या टिकेमुळे पुन्हा चर्चेत आले आहेत.

Shiv Sena MLA Sanjay Gaikwad criticizes BJ

author img

By

Published : Apr 18, 2021, 3:34 PM IST

Updated : Apr 18, 2021, 3:54 PM IST

बुलडाणा - बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड हे नेहमी आपल्या वक्तव्यावरुन नेहमीच चर्चेत राहतात. यावेळी मात्र ते भाजप व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पातळी सोडून केलेल्या टिकेमुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. सध्याच्या काळात कोणालाही कोरोना होऊ नये असे वाटत असताना आमदार संजय गायकवाड म्हणतात की, मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते तर ते देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबले असते. संजय गायकवाड यांनी केलेली टीका पातळी सोडून असल्याने भाजपात संतापाची लाट उसळली आहे. यामुळे याचे पडसाद उमटल्याची चिन्हे दिसत आहेत.

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड

महाराष्ट्रातल्या भाजपच्या लोकांचे नीच राजकारण उभा महाराष्ट्र पाहत आहे -

महाराष्ट्रात कोरोना साथीचा कहर सुरू आहे. या संकट काळात केंद्रातले नरेंद्र मोदी सरकार सहकार्य करण्याऐवजी उलट कोंडी करत आहे. तर महाराष्ट्रातील भाजपची मंडळी खिल्ली उडवीत आहेत. भाजपच्या लोकांचे नीच राजकारण उभा महाराष्ट्र पाहत आहे, असा आरोप बुलडाणा विधानसभेचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केले. यावेळी त्यांनी केंद्र आणि भाजपच्या राजकारणावर संताप व्यक्त करीत पंतप्रधान मोदी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि आ.चंद्रकांत पाटलांवर मुक्ताफळे त्यांनी उधळली. इतक्या न थांबता आमदार गायकवाड यांनी सांगितले कि, ज्याचा घरातील माणूस कोरोनाने मरतो त्यालाच माहीत आहे कि, कोरोना काय आहे. मात्र भाजपवाल्यांना याची जाण नाही. मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते तर ते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते, असे बेताल वक्तव्य त्यांनी केले.

Last Updated : Apr 18, 2021, 3:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.