बुलडाणा - कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने याचा प्रादुर्भाव वाढू नये, याकरिता बुलडाणा नगर परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत याची खबरदारी घेतली जात आहे. संपूर्ण शहरात फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शहरातील सील करण्यात आलेल्या परिसरातदेखील निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.
बुलडाणा शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 5 असून, संपूर्ण जिल्ह्यात 11 बाधित रुग्ण आढळले आहे. बुलडाणा शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, याकरिता आरोग्य विभागाच्या वतीने 15 ते 20 फवारणीचे ट्रॅक्टरच्या सहाय्याने पाण्यात सोडियम हायपोक्लोराईट मिसळून शहरातील प्रत्येक भागात युद्धपातळीवर फवारणी केली जात आहे. जे शहरातील भाग सील करण्यात आले आहेत, त्या भागातही मोठ्या प्रमाणात फवारणी करण्यात येत आहे. तसेच हर्बोडस्ट, इंडो पाउडरचीही फवारणी करण्यात येत आल्याची माहिती, नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक सुनील बेंडवाल यांनी दिली आहे.
बुलडाणा शहरात ट्रॅक्टरच्या साहाय्याने हायपोक्लोराईटची फवारणी
बुलडाणा शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 5 असून, संपूर्ण जिल्ह्यात 11 बाधित रुग्ण आढळले आहे. बुलडाणा शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, याकरिता आरोग्य विभागाच्या वतीने 15 ते 20 फवारणीचे ट्रॅक्टरच्या सहाय्याने पाण्यात सोडियम हायपोक्लोराईट मिसळून शहरातील प्रत्येक भागात युद्धपातळीवर फवारणी केली जात आहे.