बुलडाणा/सैलानी: या यात्रेला सैलानी बाबाच्या दरबारात हजेरी लावण्याकरिता संपूर्ण देशातून भाविक लोक येत असतात. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आपली मनोकामना पूर्ण इथे होतात अशी इथली मान्यता आहे. या यात्रेबद्दल अनेकांना त्यांचे स्वतःचे अनुभव आलेले आहेत आणि त्याच करता वर्षातून एकदा होळीच्या दिवशी इथे सैलानी बाबांच्या दरबारात सर्वधर्मिय भाविक आपली हजेरी देत असतात. अत्यंत नियोजनबद्ध शिस्तबद्ध पद्धतीने ही यात्रा संपन्न होत असते.
सैलानीत लाखो नारळांची होळी: बुलडाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या सैलानी बाबाच्या यात्रेत सोमवारी नारळाची होळी पेटवली गेली. सैलानी बाबाची यात्रा भरलेली आहे. या उत्सवाकरिता देशभरातून सर्व धर्मीय भावीक सैलानी गावात दाखल होत आहेत. मागील तीन वर्षांच्या काळानंतर पुन्हा एकदा सैलानी बाबा यात्रा महोत्सव साजरा केला जात आहे. उत्सवातून नफा कमविण्यासाठी संख्येत छोटे-मोठे व्यावसायिक देखील सैलानी गावात तळ ठोकून आहेत. त्यामुळे यंदा भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी बुलडाणा पोलीस यंत्रणे कडूनही तगडा बंदोबस्त उभारण्यात आला आहे.
होळीचे विधिवत दहन: दुपारी तीन वाजता स्थानिक मुजावर यांच्या हस्ते या नारळाच्या होळीचं पूजन करून ही नारळाची होळी पेटवण्यात आली.ज्यासाठी सैलानी बाबांच्या या यात्रेत भाविकांची मोठी मांदियाळी होती. काळे बाहुले, बिबे, लिंबू, गोटे, खिळे, टाचलेली नारळ मनोरुग्णांच्या अंगावरून ओवाळून जळणाऱ्या होळीत टाकले जातात. असे केल्याने अंगातील व्याधी दूर होते, अशी भावना भक्तांमध्ये आहे. याच कारणामुळे दरवर्षी तब्बल पंधरा ते वीस ट्रक नारळांची होळी येथे केली जाते.
कडेकोट सुरक्षा व्यवस्था: होळीच्या जागेभोवती बॅरिकेड्स लावण्यात आले होते. यात्रेदरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस दलातर्फे चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोबतच अग्निशामक दलेही आहेत. यासह वाहतूक पोलीस, दामिनी पथक, आरसीपी पथकाची तुकडी सज्ज असेल. सोबतच गृहरक्षक दलाचे जवान देखील यात्रेतील बारीकसारीक घडामोडींवर लक्ष ठेवून असेल.