बुलडाणा - नदीला पूर आल्यामुळे चक्क जीव धोक्यात घालून अंत्यसंस्कार करण्याची वेळ बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील पिंपळखुटा या गावातील ग्रामस्थांवर आली आहे. अनेकांनी तर नदी काठच्या बाजूला उभे राहूनच अंत्यदर्शन घेतले. रस्ता नसल्याने जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागत असल्याचे येथील नागरिक सांगतात.
हेही वाचा - भाजप स्वबळावर लढणार? मुंबईत खलबतं
पिंपळखुटा महादेव येथील शंकरसिंह बाबुराव मोरे (वय ५५ वर्षे) यांचे आकस्मित निधन झाले. त्यामुळे त्याची माहिती सर्व नातेवाईकांना देण्यात आली. मात्र, जेव्हा नातेवाईक गावाजवळ पोहचले तेंव्हा जवळून जाणाऱ्या नदीला पूर आला होता. त्यामुळे नातेवाईक नदीच्या दुसऱ्या काठावर अडकले. त्यानंतर काहींनी चक्क जीव धोक्यात घालून नदी पार केली तर काहींनी नदी काठूनच अंत्यदर्शन घेऊन परतले. या गावात नदी पार करून जाण्यासाठी रस्ता नसल्याने ही वेळ त्यांच्यावर आली आहे.
हेही वाचा - ओसामा बिन लादेनचा मुलगा हामजा बिन लादेन ठार; डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती
पिंपळखुटा महादेव या गावात जाण्यासाठी एकच मार्ग आहे. त्याही मार्गावर नदी असल्यामुळे नदी पार करुण जावे लागते, पावसाळ्यात नदीला पाणी असले की गावांचा संपर्क तुटतो, दरवर्षी हीच अवस्था असून अश्या जीवघेण्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. शालेय विद्यार्थी, आजारी रुग्ण तसेच इतर कामासाठी एकमेव मार्ग आहे. पावसाळ्यात 4 महीने रस्ता बंद असतो. त्यामुळे सर्व कामे ठप्प होतात.
हेही वाचा - 'तुम तो ठेहरे परदेसी' गाण्यावर वरुण धवनचा मजेशीर डान्स, व्हिडिओ व्हायरल
यामध्ये शुक्रवारी पिंपळखुटा येथील शंकरसिंह बाबुराव मोरे यांचे निधन झाले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार नदी पलिकडच्या स्मशानभूमीमध्ये करायचे होते. त्यानुसार अंत्ययात्रेसाठी बाहेर गावावरून नातेवाईक आले होते. मात्र, दोन नद्यांचा संगम असल्यामुळे दोन्ही नद्यांना पूर आला होता. स्मशानभूमी नदीच्या पलिकडच्या काठावर असल्यामुळे तिथे शव घेऊन जाणे मोठे जिकरीचे होते. मृतदेह तिथपर्यंत कसेबसे पोहोचवण्यात आला. मात्र, बाहेर गावावरुन नातेवाईक मंडळी आली तेव्हा त्याना स्मशानभूमीमध्ये जाऊन अंत्यदर्शन घ्यायचे होते. पण, नदीला पूर असल्याने जायचे कसे? असा प्रश्न ग्रामस्थ व नातेवाईकांना पडला होता. तेव्हा ग्रामस्थांनी चक्क स्वतःचा जीव धोक्यात घालून मानवी साखळी तयार करण्यात आली व त्यानंतर काही महिला व पुरुषांना नदीच्या दुसऱ्या काठावर पोहोचवण्याचे काम तरुणांनी केले. त्यामुळे या गावाल रस्ता देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.