बुलडाणा - खामगाव तालुक्यातील आंबेटाकळी या गावातील एका माजी सैनिकाने आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. मृत गोपाल चराटे (वय, 36) हे काही महिन्यांपूर्वीच सेवा पूर्ण करून गावी परतले होते.
गावातील एका विहिरीमध्ये सराटे यांच्यासह त्यांची एक ६ वर्षीय मुलगी एक ४ वर्षीय मुलगा या तिघांचे मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आले. याबाबत नागरिकांनी तत्काळ खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. चराटे यांच्या आत्महत्येचे कारण समजलेले नाही. पोलीस याबाबत तपास करत आहेत.