बुलडाणा - महावितरणच्यावतीने लॉकडाऊनच्या काळातील व त्यानंतरच्या काळातील वीज बिले वाढीव व चुकीच्या रिडिंगद्वारे देण्यात आली. यामुळे नेहमीच्या बिला पेक्षा अनेक पट बिल वाढले. याची तक्रार नागरिकांनी आमच्याकडे केली असून अशी चुकीचे बिले देणाऱ्या एजन्सीकडून ती वसूल करावी, लॉकडाऊन काळातील बिले माफ करावी, मीटर भाडे व इतर आकार नेहमीसाठी रद्द करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी महावितरण कंपनीकडे केली आहे. ही मागणी पूर्ण न झाल्यास आम्ही राज्यभर आंदोलन उभारू असा इशारा त्यांनी दिला आहे.
स्थानिक पत्रकार भवनात मंगळवारी रविकांत तुपकर यांनी विद्युत वितरण कंपनीची पोल-खोल करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी मीटर रिडींग बिले देणाऱ्या एजन्सीकडून कशाप्रकारे शेकडो ग्राहकांना नेहमीच्या बिलाप्रमाणे तिप्पट व पाच पट बिले देण्यात आल्याची प्रकरणे चव्हाट्यावर आणली. चुकीचे बिल दिल्या गेले तर ते बिले मीटर रिडींग बिले देणाऱ्या एजन्सीकडून वसूल करण्याचे नियम असल्याचे सांगत, ही बिले मीटर रिडींग बिले देणाऱ्या एजन्सीकडूनच वसूल करावी, अशी मागणी त्यांनी महावितरण कंपनीला केली.
यासंदर्भात तुपकर यांनी सगळ्या तक्रारी घेवून सोमवारी जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता देवहाते यांचे कक्ष गाठत ग्राहकांना देण्यात आलेल्या अव्वाच्या-सव्वा बिलाबाबत माहिती देत मीटर रिडींग बिले देणाऱ्या एजन्सीवर कारवाई करून त्यांच्याकडून देण्यात आलेल्या चुकीचे बिलांची वसुली करण्याबाबत मागणी केली. मात्र त्यावेळी अधीक्षक अभियंता देवहाते यांनी चुकीचे उत्तरे दिल्याने तुपकरांनी तब्बल चार तास अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. यामुळे जून ते सप्टेंबर या कालावधीतील आलेली चुकीची विद्युत बिले संपूर्ण मीटर रिडींग बिले देणाऱ्या एजन्सीकडून वसूल करू असे आश्वासन दिल्याने तुपकरांनी आपला ठिय्या आंदोलन परत घेतले.
महावितरण कंपनीकडून चुकीचे वीज बिले व महावितरणात सुरू असलेला सावळा गोंधळ याबाबतची माहिती देण्यासाठी त्यांनी पत्रकार भवनात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी नेहमीच्या बिलाप्रमाणे तिप्पट व पाच पट बिले ग्राहकांना देण्यात येणाऱ्या चुकीचे बिले मीटर रिडींग बिले देणाऱ्या एजन्सीकडून वसूल करावी, लॉकडाऊन काळातील बिले माफ करावी, मीटर भाडे व इतर आकार नेहमीसाठी रद्द करावी, अशी मागणी केली. ही मागणी ही मागणी पूर्ण न झाल्यास आम्ही राज्यभर आंदोलन उभारू असा इशारा त्यांनी दिला आहे.
हेही वाचा - भारिपचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोनेंनी कोरोनाग्रस्त रुग्णांना सेवा देण्यासाठी मागितली परवानगी
हेही वाचा - माजी आमदार शिंदेचा शिवसेनेनंतर वंचितलाही रामराम, हाती घेतला भाजपचा झेंडा