बुलडाणा : आमदार संजय गायकवाड म्हणाले की, भविष्यातले असे प्रकार रोखण्यासाठी आरोपींवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. बुलडाणा जिल्ह्यातील याच राजुर घाटात गेल्या वर्षभरात अशा अनेक अत्याचाराच्या घटना घडल्या असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. या प्रकरणी बुलडाणा पोलिसांनी ७ आरोपींना अटक केली आहे. त्यामुळे आता पोलीस या प्रकरणात नेमकी काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
काय आहे घटनाक्रम - बुलडाणा शहराला लागून असलेल्या राजुर घाटात ३५ वर्षीय महिलेवर ८ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा गुन्हा बोराखेडी पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. स्वतः आमदार संजय गायकवाड हे ३ तास बोराखेडी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून होते. हे वृत्त पसरतात संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. मात्र, या प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळाले आहे. या प्रकरणात पीडित महिलेऐवजी तिच्यासोबत असलेल्या नातेवाईक पुरुषाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता; मात्र माझ्यावर कोणताही लैंगिक अत्याचार झाला नाही. आरोपींनी आमच्याकडील पैसे, मोबाईल नेले, आमचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची व समाजात बदनामी करण्याची धमकी दिली. यानंतर आरोपी तिथून निघून गेले, असे पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले. लैंगिक अत्याचार झालेलाच नाही. त्यामुळे माझ्या वैद्यकीय तपासणीची गरज नाही असेही पीडिताने पोलिसांना लिहून दिले आहे. सध्या ७ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
7 आरोपी जेरबंद : घटनेची तक्रार बोराखेडी पोलिसांत दिल्यावर पोलिसांनी आठ आरोपींवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तत्काळ तीन पथके तयार करून ७ आरोपींना जेरबंदसुद्धा केले होते. मात्र, आता पीडित महिलेने आपल्यासोबत असे काही घडलेच नाही, असे म्हटले असून प्रकरणाला वेगळे वळण आले आहे. पोलिसही आता त्या बाजूने तपास करत आहेत. पीडित महिलेने तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार झाला नसल्याचा जबाब दिला आहे.
महिलेचा इन कॅमेरा जबाब : सामूहिक बलात्कारासंदर्भाने वैद्यकीय तपासणी करण्याची गरजही नसल्याचे पीडितेने मोताळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसमोर स्पष्टपणे लिहून दिले आहे. पीडित महिलेचा मोताळा न्यायालयातही इन कॅमेरा जबाब घेण्यात आला आहे, अशी माहिती काल उपविभागीय पोलीस अधिकारी गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली होती. आता पुढील तपास पोलीस काय करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. याच संदर्भात आज आमदार संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची माहिती दिली आहे.
हेही वाचा: