ETV Bharat / state

Jal Samadhi: रविकांत तुपकरांसह शेतकऱ्यांकडून जलसमाधी आंदोलनाची तयारी

author img

By

Published : Nov 23, 2022, 10:39 AM IST

Updated : Nov 23, 2022, 10:44 AM IST

Jal Samadhi: सरकारने कितीही दबाव आणला तरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अरबी समुद्रात जलसमाधी आंदोलन करणारच, असा पुनरुच्चार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केला.

Jal Samadhi
Jal Samadhi

बुलढाणा: रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात सोयाबीन- कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी मुंबईतील अरबी समुद्रात जलसमाधी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाची आज जय्यत तयारी सुरू आहे. स्वाभिमानी जनसंपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांची हजेरी लागत आहे. दरम्यान पोलीस यंत्रणा देखील सतर्क झालेली आहे.

शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलनाची तयारी

सकाळी मुंबईकडे कूच करणार: रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी मुंबईतील अरबी समुद्रात जलसमाधी घेणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. रविकांत तुपकर शेतकऱ्यांसह बुलढाणा शहरातील स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटर येथून आज सकाळी मुंबईकडे कूच करणार आहेत. त्यांचा जाण्याचा मार्ग बुलढाणा शहर- धाड-भोकरदन-सिल्लोड-छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद)-अहमदनगर-चाकण- लोणावळा असा सांगण्यात येत आहे. 23 नोव्हेंबर रात्रीचा मुक्काम पनवेलमध्ये करणार आहेत व 24 नोव्हेंबरच्या सकाळी 10.00 वा. मुंबईत मंत्रालयाशेजारील अरबी समुद्रात जलसमाधी घेणार असा इशारा देण्यात आला आहे.

सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे तुपकरांचा आंदोलनाचा इशारा: सोयाबीन, कापूस आणि ऊसप्रश्नी रविकांत तुपकर यांनी गेल्या अनेक दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली आहे. खाजगी बाजारात सोयाबीनचा भाव प्रति क्विंटल 8,500 रुपये तसेच कापसाचा भाव प्रति क्विंटल12,500 रुपये स्थिर राहावा यासाठी सरकारने धोरण आखावं, यासह इतर मागण्यांसाठी रविकांत तुपकर आक्रमक झाले आहेत.

जलसमाधी घेणार असल्याचा इशारा: सरकारने सोयाबीन, कापूस आणि ऊस उत्पादकांच्या प्रश्नावर दुर्लक्ष केल्यामुळे रविकांत तुपकर यांनी मुंबईच्या मंत्रालयाशेजारील अरबी समुद्रात 24 नोव्हेंबर रोजी हजारो शेतकऱ्यांसह जलसमाधी घेणार असल्याचा इशारा दिला आहे. यामुळे प्रशासनाची आता चांगलीच तारांबळ उडालेली आहे. रविकांत तुपकर मात्र आंदोलनावर ठाम असल्यामुळे सरकार आणि तुपकरांमध्ये संघर्ष होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

Last Updated : Nov 23, 2022, 10:44 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.