ETV Bharat / state

पॅरोलवर सुटून पळून गेलेल्या खुनातील आरोपीला तब्बल 15 वर्षानंतर अटक - arrest

सुभाष रामदास गवई संचित रजेवर जेलमधून बाहेर आला होता. मात्र तेव्हापासून तो फरार होता.

फरार आरोपी
author img

By

Published : Jul 29, 2019, 1:59 PM IST

बुलडाणा- पॅरोलवर सुटून पळून गेलेल्या खुनातील आरोपीला पोलिसांनी तब्बल 15 वर्षानंतर पकडले आहे. आरोपीला जळगाव जामोद पोलिसांनी मुंबई येथून अटक केली.

सुभाष रामदास गवई हा 51 वर्षीय आरोपी बुलडाणा जेलमध्ये एका खून प्रकरणात आजन्म कारावासाची शिक्षा भोगत होता. सदर गुन्हेगार हा 2004 साली संचित रजेवर जेल मधून बाहेर आला होता. मात्र तेव्हापासून तो फरार होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध जळगाव जामोद पोलिसात कलम 224 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

फरार आरोपी 15 वर्षानंतर ताब्यात

सदर आरोपी नवी मुंबई येथे राहत असल्याची माहिती जळगाव जामोद पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सायबर विभागाची मदत घेत गुन्हेगार सुभाष गवई याला अटक करण्यात यश मिळवले. त्याला न्यायालयासमोर हजर केल्यानंतर बुलडाणा जेलमध्ये त्याची रवानगी करण्यात आली आहे.

Intro:Body:बुलडाणा: खून प्रकरणातील आरोपी असलेल्या सुभाष रामदास गवई जेलमधून पॅरोलवर सुटून परत जेलमध्ये न गेल्याने पोलिसांनी सदर आरोपींची शोधाशोध केली होती मात्र तो मिळून आला नाही दरम्यान जळगाव जामोद पोलिसांनी सदर आरोपीला पंधरा वर्षानंतर मुंबई येथून अटक करण्यात यश मिळवले आहे.

सुभाष रामदास गवई हा 51 वर्षीय आरोपी बुलडाणा जेलमध्ये हे एका खून प्रकरणात आजन्म कारावासाची शिक्षा भोगत आहे सदर गुन्हेगार हा 2004 साली संचित रजेवर जेल मधून बाहेर आला होता मात्र तेव्हापासून तो फरार झाल्याने त्याच्याविरुद्ध जळगाव जामोद पोलिसात कलम 224 नुसार गुन्हा ही दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून हा आरोपी फरार होता सदर आरोपी हा नवी मुंबई येथील राहत असल्याची माहितीवजळगाव जामोद पोलिसांना मिळाल्यावरून सायबर विभागाची मदत घेत पोलिसांनी गुन्हेगार सुभाष गवई याला अटक करून त्याला न्यायालयासमोर हजर केल्यानंतर बुलडाणा जेलमध्ये त्याची रवानगी करण्यात आली आहे.

बाईट - सुनील जाधव (ठानेदार जळगाव जामोद)

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.