ETV Bharat / state

बनावट नोटांसह दोन जणांना अटक; तीन लाखांचा मुद्देमाल जप्त - बुलडाला बनावट नोटा बातमी

बोराखेडी पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक अशोक रोकडे यांच्या नेतृत्वात पहाटे 2 वाजताच्या सुमारास मोताळा-मलकापूर मार्गावरील नळगंगा फाट्यानजीक नाकाबंदी केली होती.

police-arrested-two-men-with-fake-currency-in-buldana
police-arrested-two-men-with-fake-currency-in-buldana
author img

By

Published : Jan 21, 2020, 6:32 PM IST

बुलडाणा - मोताळा तालुक्यातील दोन लाख 92 हजारांच्या बनावट नोटांसह दोघांना बोराखेडी पोलिसांनी शिताफीने पकडले. ही कारवाई काल (सोमवारी) पहाटे दोन ते चार वाजताच्या दरम्यान करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी राजेंद्र सदाशिव बोरले व नामदेव फुलसिंग चव्हाण या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बनावट नोटासह दोन जणांना अटक

हेही वाचा- मंगलप्रभात लोढा यांची भाजप मुंबई अध्यक्ष पदावरून उचलबांगडी?

बोराखेडी पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक अशोक रोकडे यांच्या नेतृत्वात पहाटे 2 वाजताच्या सुमारास मोताळा-मलकापूर मार्गावरील नळगंगा फाट्यानजिक नाकाबंदी केली. दरम्यान, राजेंद्र सदाशिव बोरले (55, रा. जहांगीरपूर ता. मोताळा) व नामदेव फुलसिंग चव्हाण (45, रा. मोरखेड ता. मलकापूर) हे दोघे दोन दुचाकीवर मलकापूरकडून मोताळ्याकडे येताना दिसून आले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली.

दरम्यान, संशय आल्याने पोलिसांनी त्यांची झाडाझडती घेतली. त्यांच्याकडे दोन हजार रुपयांच्या 146 बनावट नोटा (दर्शनी किंमत 2 लाख 92 हजार रुपये), पाचशे रुपयांच्या पाच नोटा (किंमत 2500 रुपये), दोन दुचाकी (किंमत 40 हजार रुपये), तीन मोबाईल (किंमत 7 हजार रुपये) असा एकूण 3 लाख 41 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. न्यायालयाने आरोपींना 26 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुणावली आहे. दरम्यान, या प्रकारामुळे जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. पुढील तपास बोराखेडीचे पोलिस निरिक्षक माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Intro:Body:बुलडाणा:--मोताळा तालुक्यातील दोन लाख 92 हजारांच्या बनावट नोटांसह मोताळा-मलकापूर मार्गावरील नळगंगा फाट्यानजीक दोघांना बोराखेडी पोलिसांनी शिताफीने पकडले. सदर कारवाई सोमवारी 20 जानेवारीच्या पहाटे दोन ते चार वाजताच्या दरम्यान
करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी राजेंद्र सदाशिव बोरले व नामदेव फुलसिंग चव्हाण या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

बोराखेडी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे पीएसआय अशोक रोकडे यांच्या नेतृत्वात सोमवारी 20 जानेवारीच्या पहाटे 2 वाजताच्या सुमारास मोताळा-मलकापूर मार्गावरील नळगंगा फाट्यानजीक नाकाबंदी केली. दरम्यान, राजेंद्र सदाशिव बोरले (55, रा. जहांगीरपूर ता. मोताळा) व नामदेव फुलसिंग चव्हाण (45, रा. मोरखेड ता. मलकापूर) हे दोघे जण दोन दुचाकीवर मलकापूरकडून मोताळ्याकडे येताना दिसून आले. पोलिसांनी त्यांना थांबवून चौकशी केली. दरम्यान, संशय आल्याने पोलिसांनी त्यांची झाडाझडती घेतली असता, दोघांच्या खिशातून भारतीय चलनातील दोन हजार रुपयांच्या 146 बनावट नोटा (दर्शनी किंमत 2 लाख 92 हजार रुपये), पाचशे रुपयांच्या पाच नोटा (किंमत 2500 रुपये), दोन दुचाकी (किंमत 40 हजार रुपये),तीन मोबाईल (किंमत 7 हजार रुपये) असा एकूण 3 लाख 41 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. आरोपींनी भारतीय चलनातील नकली नोटा उपयोग करण्यासाठी ताब्यात ठेवल्या होत्या.बोराखेडी पोलिसांनी दोघा आरोपींविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून अटक केली असून न्यायालयाने आरोपींना 26 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकारामुळे जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. पुढील तपास बोराखेडीचे पोलिस निरीक्षक माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय श्री जंजाळ करीत आहेत.

बाईट:- अशोक काकडे,पोलीस उपनिरीक्षक,बोरखेडी..

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.