ETV Bharat / state

बुलडाण्यात फुलला.. होळीचा व नवनिर्मितीचा संकेत देणारा पळस - holi

बुलडाण्याला लागूनच असलेल्या राजूर घाटाच्या समाप्तीनंतर रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात असलेले पळसाच्या झाडांना लाल रंगांचे फुले फुलली आहे.ते सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

फुललेला पळस
फुललेला पळस
author img

By

Published : Mar 28, 2021, 10:52 AM IST

बुलडाणा - कोरोनाने अख्खे जग थांबले आहे,मात्र निसर्गचक्र सुरूच आहे.दरवर्षीप्रमाणे या वर्षीचाही कोरोना काळात नवनिर्मितीचा व होळीचा संकेत देणारा पळस फुलला आहे.पळसाची लाल रंगाची फुले शोभून दिसत असल्याने ही फुले सर्वांचे लक्ष वेधून घेतात. बुलडाण्याला लागूनच असलेल्या राजूर घाटाच्या समाप्तीनंतर रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात असलेले पळसाच्या झाडांना लाल रंगांचे फुले फुलली आहे.ते सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

वसंताचे स्वागत करण्यासाठी नटलेला पळस

शिशीराची थंडी ओसरायला लागली. पानगळीने उघडी पडलेली वृक्षराजी नव्या पालवीचे लेणे अंगावर मिरवायला लागली की,वसंताची चाहूल लागते.या वसंतात फक्त रंगाची उधळण,रंगोत्सव सुरु होतो निसर्गाचा.शिशिरात बोडक्या झालेल्या शेतीला केशरी लाल रंगात न्हाऊ घालणारा पळस बहरला आहे.वसंताचे स्वागत करण्यासाठी नटलेला पळस चोहीकडे पहावयास मिळत आहे.झाडाच्या प्रत्येक फांदीवर लगडलेली फुले विस्तवाच्या गोळ्यांसारखी दिसत आहे.20-25 फूट उंच असणाऱ्या पळसाला संस्कृतमध्ये पलाश म्हणतात.याचा अर्थ फुलांनी डवरलेले झाड असा होतो.पळसाची फुले श्री सरस्वती आणि काली माता या दोन्ही देवीच्या पूजेसाठी वापरली जातात. कुठेही गेले तरी पळसाला पाने तीनच,अशी म्हण प्रचलित आहे. पळसाची पानेही फार उपयोगी आहेत. पूर्वी या पानापासून मोठ्या पंगतीला जेवण देण्यासाठी द्रोण आणि पत्रावळ्या बनवल्या जात. आता काळ बदलला तरी त्याचे महत्त्व कमी झालेले नाही.शिवाय होळीचा सण साजरा करण्यासाठी या पळसाच्या फुलांचा वापर करून रंग बनवण्यासाठी केला जातो.

फुललेला पळस
फुललेला पळस
हेही वाचा - स्कॉर्पिओत धमकीचे पत्र ठेवायला विसरला होता सचिन वाझे

उपयोगी पळस
पळस हा डोंगराळ भागात किंवा शेताच्या धुऱ्या बांधावर दिसणारा वृक्ष आहे.त्याची उंची जास्त नसून तो पानगळी वृक्ष आहे.त्याचे खोड आणि फांद्या वेड्या-वाकड्या असतात.तर त्याची साल खडबडीत राखाडी रंगाची असते.पाने आकाराने मोठी असतात. आणि केवळ तीनच असल्याने, त्याच्या पासून द्रोण,पत्रावळी बनवतात.ज्या काळी वृक्षांना पडझड असते. म्हणजे उन्हाळ्यात फेब्रुवारी व मार्च महिन्यात पळसाला फुलांचे घुमारे फुटतात.सध्या मार्च महिना असून पळसाच्या झाडाला लाल,केशरी रंगाचे फुले फुललेली दिसत आहे.त्यामुळे पळस अक्षरशः ज्वाला सारखा दिसत आहे.बुलडाण्यापासून जवळच असलेल्या राजूर घाटाच्या समाप्तीनंतर रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात पळस फुलला आहे.

पळस सृजनतेचे ,नवनिर्मितीचे प्रतीक

हेही वाचा - सनदी अधिकाऱ्यांना निवृत्तीनंतर पाच वर्षांनी राजकीय प्रवेश द्यावा; इम्तियाज जलील यांची मागणी

पळस सृजनतेचे ,नवनिर्मितीचे प्रतीक - गणेश केळवदकर
पळस हे सृजनतेचा आणि नवनिर्मितीचा प्रतीक आहे.पळस फ़ुलला म्हणजे तुमचा पुढचा ऋतू येणार आहे.म्हणजे नवीन पालवी येणार आहे.नवीन निर्मिती होणार. त्याच हे प्रतीक आहे.आज आपल्याला विज्ञानातून सर्व गोष्टी प्राप्त झाल्या आहे.परंतु पूर्वीचा जो काळ होता.लोक ठराविक दिवस लक्षात ठेवायचे.आणि त्याच्यातून मग आकलन व्हायचे.जसे पेरणीच्या आगोदर एक पक्षी यायचा आणि पेरणीचा संकेत द्यायचा.किंवा नदीच्या काठी गेल्यास तर लाल रंगाचे देवकिडा वर यायचे. आणि वर आल्यावर लोकांना अस कळायचं की, पेरणीची वेळ जवळ आली आहे. जसा पळस फुलायचा, तसा पळस फ़ुलला म्हणजे, तो होळीचा सण आहे, असे समजावे. पळसाला फुले आली की, होळी जवळ आल्याचे समजावे.आज आपल्याकडे सर्व काही उपलब्ध आहे.परंतु हा जुन्या काळातील इतिहास आहे. आत्ता होळीसाठी आपण जे रंग वापरतो, ते मार्केटमध्ये खूप रंग उपलब्ध झालेले आहे.परंतु हे जे रंग आरोग्यासाठी चांगले नसून त्रासदायक आणि हानिकारक आहे. नैसर्गिक रंग म्हणून पळसाच्या फुलाच्या रंगांचा वापर केला जातो, असे मत साहित्यिक गणेश निकम केळवदकर यांनी दिली.

जीवनाविषयी जगण्याचा आशावाद निर्माण करणारा पळस
होळीची चाहूल देणारा पळस फ़ुलला आहे.कोरोनामूळे जिथे भय,संकट पसरले आहे.तिथे पळसाच्या लाल-लाल रंगाने पळसाचा जो बहर फ़ुलला आहे.तो जीवना विषयी जगण्याचा नवा आशावाद निर्माण करणारा नक्की आहे.जो सर्व संकटांशी सामना करण्याचा संदेश नक्की देतो.हे मात्र खरे..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.