बुलडाणा - शहरापासून १० किलोमीटरवर असलेल्या भादोला येथील पेट्रोल पंपाजवळ दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून सोमवारी २५ फेब्रुवारीला रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
गजानन नारायण जेऊघाले (वय ३८) असे मृताचे नाव असून तो वरवंट येथील रहिवासी आहे. ते सोमवारी रात्रीच्या सुमारास आपले काम आटोपून बुलडाण्यावरून वरवंट येथे जात होते. यावेळी भादोला येथील पेट्रोल पंपजवळ दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये त्यांची जागीच मृत्यू झाला. दरम्यान संबंधित घटना मंगळवारी उघडकीस आली. त्यांचा मृत्यू कसा झाला? याबाबत माहिती मिळाली नसून पुढील तपास बुलडाणा ग्रामीण पोलीस करीत आहेत.