बुलडाणा - परदेशातून आलेल्या 70 वर्षीय वृद्धाचा शनिवारी बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला होता. या वृद्धाचा मृत्यू कोरोनाच्या संसर्गामुळे झाला नसल्याचा खुलासा डॉक्टरांनी केले आहे. नागपूर येथून आलेल्या नमुन्याच्या अहवालातून हे स्पष्ट झाले, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रेमचंद पंडित यांनी सांगितले आहे.
25 फेब्रुवारीपासून सौदी अरबला उमऱ्यासाठी (हजसाठी) गेलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील 70 वर्षीय वृद्ध नागरिक शुक्रवारी (13 मार्च) मुंबईहून बुलडाण्यात दाखल झाले होते. त्यांना त्रास झाल्याने आणि त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षण आढळल्यामुळे त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता का, याची शहानिशा करण्यासाठी त्यांची नागपूर येथे नमुने पाठवून कोरोना चाचणी करण्यात आली. त्या नमुन्याच्या अहवालात मृत वृद्धास कोरोनाची लागण झाली नव्हती, हे स्पष्ट झाले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पंडित यांनी ही माहिती दिली.
हेही वाचा - विदेशातील १२ पाहुणे बुलडाण्यात; सर्दीची लक्षणे दिसल्याने तिघे आयसोलेशनमध्ये, नऊ जण देखरेखीखाली
हेही वाचा - Coronavirus: रायगडचे दुबई रिटर्न क्रिकेटर्स पनवेल उपजिल्हा रुग्णालयात