ETV Bharat / state

लॉकडाऊन इफेक्ट..! विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देणाऱ्या शिक्षकांच्या हातात आले खुरपे - शिक्षकांवर आर्थिक संकट

खासगी व शासकीय शाळात ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. मात्र अनेक विना अनुदानित शाळाच भरल्या नसल्याने अनेक ठिकाणी खासगी संस्थाचालक पगार देत नाहीत. मग घर कसे चालवायचे या विवंचनेत काही शिक्षकांनी घरच्या शेतात राबने पसंत केले, तर काहिंना इतरांच्या शेतात मजूरी करण्याची वेळ आली आहे. परिणामी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देणाऱ्या शिक्षकांच्या हातात आता खुरपे आले आहे.

teachers working in farm
विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देणाऱ्या शिक्षकांच्या हातात आले खुरपे
author img

By

Published : Jul 19, 2020, 11:19 AM IST

Updated : Jul 28, 2020, 1:48 PM IST

बुलडाणा - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. त्या प्रमाणे शिक्षण क्षेत्रातही या कोरोनामुळे मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. गेल्या साडेतीन महिन्यांपासून सुरू असेलेल्या लॉकडाऊनमुळे नवीन शैक्षणिक वर्षाला अद्याप सुरुवात झाली नाही. काही ठिकाणी खासगी व शासकीय शाळात ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. मात्र अनेक विनाअनुदानित शाळा भरल्या नसल्याने अनेक ठिकाणी खासगी संस्थाचालक पगार देत नाहीत. मग घर कसे चालवायचे या विवंचनेत काही शिक्षकांनी घरच्या शेतात राबने पसंत केले, तर काहिंना इतरांच्या शेतात मजूरी करण्याची वेळ आली आहे. परिणामी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देणाऱ्या शिक्षकांच्या हातात आता खुरपे आले आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील आदिवासी भागातील संग्रामपूर येथील संत गुलाबबाबा विद्यालय हे गेल्या 20 वर्षापासून विना अनुदानित तत्वावर चालते. या सस्थेला आता कुठेतरी 20 टक्के अनुदान शासनाकडून प्राप्त झाले आहे. त्यामुळे येथील शिक्षकांना मिळेल त्या मानधनावर काम करावे लागते. मात्र, सध्या कोरोना महामारीमुळे मार्च महिन्यापासुन लॉकडाऊन असल्याने सर्वच शाळा बंद आहे. या काळात शाळाच सुरू झाल्या नाहीत, परिणामी या लॉकडाऊमुळे काही शिक्षकांचे पगार अद्याप झाले नाहीत. त्यामुळे या शाळेतील शिक्षकांना उदरनिर्वाहासाठी आपल्या शेतात राबण्याशिवाय पर्याय उरला नाही. ज्या शिक्षकांच्या हाती खड़ू असतो आज त्यांच्या हाती खुरपे आणि रुमने आले आहे.

संत गुलाबबाबा विद्यालयात कार्यरत असलेले लोमटे सर यांचे शिक्षण एम.ए. बी.एड. झाले आहे. तर याच शाळेतील क्रीड़ा शिक्षक सुधीर मानकर यांचा ही शिक्षण एम. ए., बी.पी.एड झाले आहे. लॉकडाऊन काळात शाळा बंद असल्यामुळे विनाअनुदानित असलेल्या या संस्थेला पगार देणे शक्य नाही, परिणामी सध्या शाळा बंद असल्याने या दोन्ही शिक्षकांना आपले कुटुंब चालविण्यासाठी शेतमजूर म्हणून काम करण्याची वेळ आली आहे. हे दोन्ही शिक्षक आज आपल्या खुरपणी, फवारणी यंत्र पाठीवर घेऊन राबत आहेत.

विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देणाऱ्या शिक्षकांच्या हातात आले खुरपे
अशीच काहीची परिस्थिती इतरही शिक्षकांची आहे. यात दिनेश वानखेडे यांचे शिक्षण बी.ए., बी.एड झाले आहे, ते देखील गेल्या अठरा वर्षापासून विना अनुदानित शाळेत सहायक शिक्षक म्हणून शिकवितात, सध्या लॉकडाऊन व त्यातही पगार नसल्याने त्याना वडिलोपार्जित शेतात कोळपनी करताना दिसत आहेत. तसेच शिक्षिका दीपाली तायड़े ज्यांचे शिक्षण बी.ए. बी.एड आहे, त्या देखील संस्थेतून शून्य पगार मिळत असल्याने चरितार्थ चालवण्यासाठी शेतात राबतात.राज्यात जवळपास 1500 विना अनुदानित शाळा असून जवळपास 50 हजारा हुन अधिक शिक्षक आहेत. सध्या लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने व नवीन सत्र सुरु न झाल्याने अशा सर्व शिक्षकांचे टुटपुंजे पगारही रखडले आहेत. त्यामुळे शिक्षकांना आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागत आहे. परिणामी त्यांना शिक्षकी पेशा सोडून रोजंदारीने कामाला जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने थोडा का असेना, पण पगार नियमित करून शिक्षकांच्या हातातील हे खुरपं आणि रुमने काढून घ्यावं आणि परत हातात खडू द्यावा अशी अपेक्षा शिक्षकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Last Updated : Jul 28, 2020, 1:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.